आशा सेविका अजुन ही मानधना पासुन वंचित

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात कोरोना महामारीच्या प्रादुर्भाव वाढत असताना आशा सेविका शहरभर फिरुन नागरिकांच्या तपासण्या व त्यांची नोंद घेन्याचे काम करत आहेत. या काळात आशा सेविकानी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना महामारी विरोधातील सुरु असलेला लढा अविरतपणे सुरूच ठेवला आहे. या काळात उल्हासनगर महानगरपालिकेने  कोरोना लॉकडाऊन मध्ये काम करणाऱ्या आशा सेविकाना  तीनशे रुपये प्रतिदिन मानधन देण्यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यानी आदेश दिला  होता. त्यांच्या आदेशाला हरताळ फासत महापालिकेने अद्याप ही या आशा सेविकाना आपले मानधन दिले नाही . या आशा सेविका बिचाऱ्या आज मिळेल उद्या मिळेल मानधन या अपेक्षेने जिवाचे रान करुन कोरोना प्रादुर्भावात काम करत आहेत . तर या आशा सेविकानी आयुक्ताना निवेदन सुध्दा दिले आहे तरी पण त्यांचे मानधन मिळाले नाही . दरम्यान या आशा सेविकाना लवकरात लवकर मानधन दिले नाही तर त्या काम बंद आंदोलन करतील असा इशारा या आशा सेविकानी दिला आहे .दरम्यान उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे या बाबत विचारले असता ते म्हणाले की आशा सेविका मानधना संदर्भात माहीती घेवुन सांगतो .

संबंधित पोस्ट