मनसोक्‍तपणे अनारोग्‍यकारक पदार्थ सेवन करण्‍याची सवय बदला! आरडी, सीडीई पोषणतज्ञ शेरिल सॅलिस

संगणकावर काम करताना किंवा टेलिव्हिजनवर आवडीची मालिका पाहताना बिस्किटे किंवा चिप्‍सचे पूर्ण पॅकेट न संपवता काहीच बिस्किटे किंवा चिप्‍स खाण्‍याची सवय कदाचित ठीक असू शकते. पण आपण अनेकदा या सवयीच्‍या आहारी जातो आणि दिवसा किंवा दुपार ते रात्रीच्‍या जेवणादरम्‍यान या 'कुरकुरीत' पदार्थांचे भरपूर प्रमाणात सेवन करतो. नियमित आहारांच्‍या दरम्‍यान चिप्‍स व कूकीज सारखे प्रक्रिया केलेले, उच्‍च कॅलरीने युक्‍त पदार्थ, पेये, तळलेले पदार्थ इत्‍यादींचा मनसोक्‍तपणे आस्‍वाद घेतला जातो.

लॉकडाऊन स्थितीमुळे लोक अशा पदार्थांचा मनसोक्‍त आस्‍वाद घेऊ लागले आहेत, किंबहुना ही स्‍नॅकिंग संस्‍कृतीच बनली आहे. किशोरवयीन व तरूण प्रौढ व्‍यक्‍ती घरातूनच दीर्घकाळापर्यंत काम करत असताना भूक लागल्‍यास किंवा कंटाळा आल्‍यास तेलकट पदार्थांचा आस्‍वाद घेत आहेत. कंटाळवाणा वाटणारा मान्‍सून त्‍यांच्‍या या लालसेमध्‍ये अधिक भर पाडतो. पण तुम्‍ही तुमच्‍या स्‍नॅकिंग पर्यायांबाबत स्‍मार्ट असाल तर तुम्‍ही त्‍याबाबत स्‍वत:ला कमी दोष द्याल. अनेकदा अशा पदार्थांच्‍या सेवनामुळे तुम्‍हाला सुस्‍त, पोट भरल्‍यासारखे वाटते किंवा अपचन होते आणि शक्‍यतो वजनामध्‍ये वाढ होते. यावर मात करण्‍यासदंर्भात पहिली पायरी म्‍हणजे पौष्टिक घटक असलेले आणि सहज पचन होऊ शकणारे पदार्थ निवडून त्‍याचा साठा करणे.

मनसोक्‍त खाण्‍याचा आस्‍वाद घेण्‍याची सवय पूर्णत: टाळणे अशक्‍य असू शकते, पण प्रथिने, फायबर आणि आरोग्‍यदायी मेदांनी युक्‍त पौष्टिक आहाराची निवड करत टप्‍प्‍याटप्‍प्‍याने खाण्‍याच्‍या सवयींवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. पौष्टिक व आरोग्‍यदायी ब्रेकफास्‍ट तुम्‍हाला दिवस उत्तमरित्‍या व्यतित करण्‍यामध्‍ये मदत करेल आणि दिवसाच्‍या सुरूवातीपासूनच स्‍नॅक्‍सचा आस्‍वाद घेण्‍याऐवजी योग्‍य प्रमाणात स्‍नॅक्‍सचे सेवन करण्‍यामध्‍ये मदत होईल. दिवसाची सुरूवात उत्तम करण्‍यासाठी दुग्‍धजन्‍य उत्‍पादने, फळे व प्रथिनयुक्‍त पदार्थांचे सेवन करा.

अनारोग्‍यकारक स्‍नॅकिंगची सवय बदलण्‍यासाठी इतर काही सूचना: 

सध्‍या मान्‍सून सुरू असल्‍यामुळे तळलेल्या पदार्थांचा आस्‍वाद घेण्‍याचे प्रमाण सर्वाधिक असते. त्‍याऐवजी मसाला पावडर, लिंबू व काही प्रमाणात मीठ टाकून उकडलेला मका आणि सोबत कपभर आल्‍याचा चहा सेवन करा. मक्‍यामध्‍ये विरघळणा-या व न विरघळणा-या फायबरचे संपन्‍न प्रमाण असते, तर आल्‍यामध्‍ये प्रबळ अण्‍टी-बॅक्‍टेरिअल व अण्‍टी-व्‍हायरल गुणधर्म असतात. हे सुपरफूड रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यामध्‍ये देखील मदत करते.

टेबलवर नट्सने भरलेले एक भांडे ठेवा आणि मूठभर बदाम, पिस्‍ता व अक्रोडचे सेवन करा. पण या सेवनावर नियंत्रण ठेवा, कारण नट्समध्‍ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज देखील असतात.

एखाद्या दिवशी पौष्टिक आहार तयार करणे कंटाळवाणे वाटत असेल तर काही ताजी फळे व तुमच्‍या आवडीच्‍या टॉपिंग्‍जनी भरलेले भांडे किंवा पेला जवळ ठेवा. स्‍मूदी हा तात्‍पुरता आहार असण्‍यासोबत आर्द्र वातावरणावर मात करण्‍यासाठी आरोग्‍यदायी पेय देखील आहे. स्‍मूदीमध्‍ये कोल्‍ड प्रेस्‍ड शुद्ध खोबरेल तेल (व्‍हर्जिन कोकोनट ऑईल) टाका. शुद्ध खोबरेल तेल हे रोगप्रतिकारशक्‍ती वाढवणारे सुपरफूड आहे. तसेच यामधून वजनावर नियंत्रण व एनर्जी बूस्‍टर यासारखे इतर आरोग्‍यदायी लाभ देखील मिळतात.

भाजलेले मखाना, भाजलेले किंवा उकडलेले चणे किंवा भाज्‍यांसह मूग चाट अशा प्रथिनसंपन्‍न स्‍नॅक्‍सचे सेवन करा.

सलाड करण्‍याच्‍या अनेक सोप्‍या पद्धती आहेत, ज्‍यामध्‍ये ताजी कोशिंबीर, टोमॅटो, काकडी, उकडलेले स्‍वीट कॉर्न, मशरूम्‍स किंवा उकडलेले चिकन यांचा समावेश असू शकतो. त्‍यामध्‍ये शुद्ध खोबरेल तेलाची (व्‍हर्जिन कोकोनट ऑईल) भर हा एक आरोग्‍यदायी पर्याय आहे. तसेच यामुळे चवीमध्‍ये अधिक स्‍वादाची भर होते.
]
शुगर फ्री प्रोटीन बार्स किंवा शाकाहारी कोकोनट स्‍प्रेडसह घरी बनवलेल्‍या रोल्‍सचा आस्‍वाद घ्‍या.
भूक लागणे हे स्‍वाभाविक आहे, विशेषत: संपूर्ण दिवस घरी असताना भूक लागतेच. ज्‍यामुळे सतत मनसोक्‍त खाण्‍याचा आस्‍वाद घेणे टाळा आणि जंक फूड, मेदयुक्‍त पदार्थ आणि नमकीन स्‍नॅक्‍स पदार्थांऐवजी पौष्टिक पदार्थांचा साठा करत स्‍नॅकिंगला आरोग्‍यदायी बनवा. दीर्घकालीन व आरोग्‍यदायी जीवनशैलीसाठी स्‍थानिक व वाजवी दरातील पदार्थ खरेदी करणे उत्तम आहे.

संबंधित पोस्ट