डोळखाबं - साकडबाव रस्त्यावर पडले झाड. बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष

शहापुर (प्रतिनिधी) : शहापुर तालुक्यातील डोळखाबं ते साकडबाव  या रस्त्यावर  डोळखाबं च्या वाडी जवळ एक मोठे झाड रस्त्याच्या मधोमध अर्धवट उन्मलून पडले आहे मागील ८ दिवसापासून रस्त्यावरील हे झाड न हलवल्याने मोठ्या गाड्यांची वाहतूक बंद झाली आहे
    
सदर झाड रस्त्यावर मधोमध असल्याने केवळ दुचाकी वाहने व इतर छोटी वाहने तेथून जात आहेत मात्र माल वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग बंद झाला असून या रस्त्यावरील गावाना मोठा फेरा घेऊन इतर रस्त्यांचा वापर करावा लागत आहे,याबाबत स्थानिक नागरिकांनी बांधकाम विभागास सूचना देऊनही हे झाड अजूनही रस्त्यावरून हटवले नसल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज भगत यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले

संबंधित पोस्ट