
उल्हासनगरात दुकानफोडी करणारा अल्पवयीन चोरटा गजाआड.
- by Rameshwar Gawai
- Aug 27, 2020
- 622 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर मध्ये एका दुकानात चोरी करणाऱ्या अल्पवयीन चोराला विठ्ठलवाडी पोलिसांनी काही तासातच बेड्या ठोकल्या आहे.आरोपींकडून एक किमंती मोबाइल व ७० हजारांची रोकड हस्तगत करन्यात आली आहे .
उल्हाननगर कॅम्प- ४ येथील सिद्धीविनायक या कपड्याच्या दुकानात एका अल्पवयीन चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली होती.या अल्पवयीन चोरट्याने दोन दुकानांची दुकान फोडी केली.दुकान फोडीचा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपूत व यांचे सहकारी हवालदार दिनेश पाटील, जितेंद्र चित्ते. निलेश तायडे. फतवे,नाना मोरे,यानी तपास करत काही तासातच अल्पवयीन चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत.आरोपींकडून एक किमंती मोबाइल व ७० हजारांची रोकड ताब्यात घेण्यात आली आहे .तर पुढील तपास विठ्ठलवाडी पोलिस करत आहेत.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम