उल्हासनगर महापालिकेने या वर्षाची घरपट्टी माफ करावी. मनसे ची मागणी.
- by Rameshwar Gawai
- Aug 26, 2020
- 1169 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : आपल्या राज्यासह संपूर्ण देशात गेल्या सहा महिण्यापासून कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे जवळपास सर्वच नागरिकांच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून. बऱ्याच लोकांच्या तर नोकऱ्या सुध्दा गेल्या आहेत.कोरोनाच्या महामारी मुळे गोर गरीब नागरिकांना आपला उदरनिर्वाह चालविने सुध्दा कठीण होऊन बसले आहे. आशा परिस्थितीत नागरिकांना आपली घरपट्टी भरणे सुध्दा शक्य नाही. त्यामुळे शहरातील सर्व व्यापाऱ्यांसह नागरिकांच्या घरांची व दुकानाची सन.२०–२१ या चालू वर्षाची संपूर्ण घरपट्टी उल्हासनगर महापालिकेने माफ करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव संजय घुगे व शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी महापौर लिलाबाई आशान व आयुक्त डा. राजा दयानिधी यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे.
दरम्यान २०१७ च्या महापालिका निवडणूक जाहीर नाम्यात ५०० फुटा पर्यंतच्या घरांना करमुक्त करण्याचे आश्वासन शिवसेनेने शहर वासीयांना दिले होते याची आठवणही बंडू देशमुख यांनी महापौरांना करून दिली आहे .
तरी महापालिकेने मनसेच्या या मागणीचा तात्काळ विचार करुन शहरातील सर्व गोर गरीब नागरिक व व्यापाऱ्याना कमीतकमी चालू वर्षाची घरपट्टी तरी माफ करुन एक प्रकारे त्याना थोडा का होईना दिलासा मिळेल असे ही बंडु देशमुख यानी निवेदनात म्हटले आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम