उल्हासनगर शहर कोरोना रिकव्हरीत देशात प्रथम . लवकरच शहर होणार कोरोना मुक्त

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिकेच्या  आयुक्त पदावर डॉ . राजा दयानिधी यानी येताच त्यानी आपल्या डॉक्टरी अनुभवातुन आणि आपल्या सहकाऱ्याना विश्वासात घेवुन कोरोना ला हरविन्या त्यानी चांगलीच कंबर कसली असुन दिवसा गणिक आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कमी मिळायला लागले आहेत . तर सर्वात जास्त प्रमाणात रुग्ण रिकव्हर होत असल्याने उल्हासनगर शहराचा नंबर रिकव्हरी मध्ये देशात प्रथम क्रमांकावर आला आहे . तर याला कोविड रुग्णालय सांभाळणाऱ्या महिला डॉक्टरांचे सुध्दा अधिक प्रमाणात योगदान आहे .

उल्हासनगर शहरात कोरोना चा एक ही रुग्ण नव्हता तेव्हा उल्हासनगर शहर हे झिरो अवस्थेत होते . दरम्यान तत्कालिन आयुक्त सुधाकर देशमुख यानी व्यापाऱ्याना विश्वासात घेवुन शहर काही दिवसा करिता लॉकडाऊन केले होते . तर मुंबई येथे जाणारे पोलिस . नर्स . वार्ड बॉय हे पुढे पॉझिटिव्ह आल्यावर व त्यांचे नातेवाईक आणि शेजारी कोरोनाच्या प्रादुर्भावाने संक्रमित झालेले आढळुन येवु लागले . त्यामुळे शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढु लागली . तेव्हा सुधाकर देशमुख देखमुख यांची पनवेल येथे बदली करुन त्यांच्या जागी समीर उन्हाळे याना आयुक्त पदावर आणले . परंतु उन्हाळे यानी ४० दिवसात काही ही एक न करता त्यांच्या कारकिर्दित कोरोनाचा प्रादुर्भाव हा संपुर्ण शहरात वाढत गेला . त्यामुळे शासनाने समीर उन्हाळे यांची सुध्दा नाशीक येथे उचलबांगडी करुन त्यांच्या भारतीय प्रशासकिय सेवेतील डॉ . राजा दयानिधी यांची नियुक्ती केली . तेव्हा त्यानी स्वता पी पी ई किट घालुन सर्व कोविड रुग्णालयांची पाहणी केली . दरम्यान २० जुलै रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे उल्हासनगर महापालिकेत आले तेव्हा त्यानी शहरात धारावी पॅटर्न प्रमाणे काम करन्याच्या सुचना देवुन स्वॅब कलेक्सन वाढविन्याचा ही सल्ला दिला . तेव्हा मंत्र्यांच्या आदेशाची अमलबजावनी  करत डॉ . राजा दयानिधी यानी काम सुरु केले . तर एक आरोग्य अधिकारी सुध्दा पर्यावरण मंत्र्यानी महापालिकेला दिला आहे . दरम्यान आयुक्त डॉ . राजा दयानिधी हे आपले सहकारी डॉ . दिलीप पगारे . डॉ . राजा रिजवानी . डॉ सुहास मुन्हाळकर . जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे . आरोग्य निरीक्षक विनोद केणे यांच्या सहकाऱ्याने कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत . केंद्रिय शासनाच्या सर्वे नूसार उल्हासनगर शहर हे रिकव्हरी मध्ये देशात प्रथम क्रमांकावर आले आहे . दरम्यान उल्हासनगर शहरात असलेल्या कोविड रुग्णालयाची कमान सांभाळ्णाऱ्या डॉ . भावना तेलंग (प्रसुतीगृह) डॉ . कविशा सिंग (आय टी आय) डॉ . ज्योती डोंगरे (कामगार) डॉ . अंकिता कौर (डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका) डॉ अर्चना गडकरी (रेड क्रास) डॉ ज्योती प्रसाद (तहसील) डॉ किर्ती  निळजे (वेदांत) आणि डॉ आशिष जुमडे (साई टे ऊराम सेंटर) यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात योगदान आहे .

संबंधित पोस्ट