उल्हासनगर येथिल किन्नरानी सामाजिक बांधिलकी जपत केली गणरायाची प्रतिस्थापना

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर येथिल किन्नरानी सर्वधर्म समभाव व एकतेचा  परिचय देत गणेशोत्सवाची सुरवात करुन दरवर्षी गणरायाची प्रतिस्थापना करुन उत्सव साजरा करतात हा उत्सव किन्नर विद्यासागर देडे , सायरा शेख , महक वाघ ,आफरीन शेख व सानिया यानी साजरा करण्याच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

उल्हासनगर शहरात किन्नर बांधव बरेच आहेत ते दरवर्षी प्रत्येक सण आनंदाने साजरा करतात  तेव्हा यंदा कोरोनाचे गंभीर संकट शहरावर असताना सुध्दा सर्वधर्मसम भाव या हेतुने किन्नर विद्यासागर देडे ,सायरा शेख,महक वाघ आफरिन शेख , व सानिया यानी गणेशोत्सव साजरा करताना सर्व शासकिय नियमाचे पालन करुन व फिजिकल डिस्टंसिग नियम पाळुन गणरायाची प्रतिस्थापना केली आहे.  शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे आणि देशा मधून राज्यातुन व शहरातुन कोरोना महामारी दुर करण्याची प्रार्थना या किन्नर बांधवानी गणरायाना केली आहे .

संबंधित पोस्ट