यंदाच बँडबाज विनाच होणार गणेश आगमन . १२ ठिकाणी केले कृत्रिम विसर्जन केंद्रे .
- by Rameshwar Gawai
- Aug 24, 2020
- 292 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : कोणतंही संकट येवो भारतीयांचा सण साजरा करण्याचा उत्साह कमी होत नाही. सध्या देशात कोरोनाचा फैलाव ओसरत असला तरी संभाव्य धोके लक्षात घेऊन महानगरपालिकेने सण-उत्सवांवर काही निर्बंध लावले आहेत. यानुसार गणेशोत्सवास प्रशासनाने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
गणेश भाविकांनी आपल्या आणि कुटुंबाच्या आरोग्य दक्षतेसाठी संसर्ग व संपर्क टाळण्या साठी यंदाचा गणेशोत्सव साध्या प्रतिकात्मक,व पर्यावरणीय पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. यानुसार, घरगुती गणपती बसविणार्यानी दोन फुटाच्या आतील मूर्ती बसवणे, प्रतिबंधक क्षेत्र वगळता मंडळांना गणेश स्थापना करतांना ऑनलाइन
http:/umcfestival.org.in या
संकेत स्थळावरून परवानगी घेणे बंधनकारक असणार आहेत.
हा उत्सव साजरा करतांंना भाविकांनी कोविड -१९ बाबतीत सर्व नियम पाळणे, सामाजिक अंतर, सँनिटायझरेशन करणे अपरिहार्य आहे. गणेश आगमण विसर्जन मिरवणूक, बँड, बँन्जो पथकांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच गणेश विसर्जन नदी, ओढे, तलावात न करता क्रुत्रीम तलाव करावे. किंवा मनपाने बनविलेल्या संकलन केंद्रांचा वापर करण्यासाठी महापालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे. तर महापाकिकेने शहरात एकुण १२ ठिकाणी गणेश विसर्जन करन्या करिता कृत्रिम विसर्जन सेंटर तयार केले आहे . दरम्यान महापालिकेचे कर्मचारी व पोलिस विभागाचे कर्मचारी हे गणेशाच्या मुर्त्या संकलन करुन या महापालिकेने तयार केलेल्या १२ विसर्जन केंद्रावर विसर्जित करन्यात येणार आहेत .
कोरोनात महापालिका प्रशासनाने
सण उत्सव, कार्यक्रम, ईव्हेंट बंद केलेत. कँप ४ येथिल सरस्वती नगर, सह शहरात हजारो बँड पथक आहेत. मागिल सहा महिन्यात संस्थानी पुरवलेल्या जेवणावर, अक्षरशः कर्ज काढून आम्ही कुटुंब पोसली.
गणेशोत्सव, नवरात्रीत आम्हाला बँड वाजवून दोन हक्काचे पैसे मिळतील असं वाटलेलं. तीही आशा मावळलीआहे. तर प्रशासनाने गरिब बँड पथकांवर अन्याय करु नये.
आम्ही सोशल डिस्टन्स, मास्क, सँनिटायझर वापरून आमची सेवा देऊ शकतो. त्यामुळे संसर्ग होणं शक्य नाही. तरी बँड, बँन्जोपथकां वरील बंदी हटवावी. अशी प्रतिक्रिया सचिन तायडे यानी दिली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम