उल्हासनगर कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार रामनाथदादा मोतेसर यांचे कोरोनाने निधन.

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर येथिल लोकप्रिय असलेले कोकण विभाग  शिक्षक मतदार संघातुन  दोन वेळा आमदार म्हणुन निवडुन आलेले रामनाथदादा मोते सर यांचे कोरोनाच्या प्रादुर्भावाने दुखद निधन झाले आहे . त्यांचे वय ६८ वर्ष होते . तर त्याना उपचारा करिता मुलूंड येथिल फोर्टिज हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते . तेथेच उपचारा दरम्यान त्यांची सकाळी प्राणज्योत मावळली . 

उल्हासनगर कॅंप ४ येथे राहणारे रामनाथ दादा मोतेसर हे येथिल सरस्वती विद्यालयात शिक्षक म्हणुन नोकरी करत होते . तर ते नेहमी शिक्षकांच्या समस्या सोडवन्यात अग्रेसर राहत होते . दरम्यान कोकण विभाग शिक्षण मतदार संघातुन सर्व शिक्षकानी त्यांच्या उमेदवारी बाबत पुढाकार घेवुन त्याना भाजपा कडुन उमेदवारी मिळाली व त्याना शिक्षकानी एकदा नव्हे दोन वेळा आमदार बनवले . दरम्यान त्यानी विधान परिषदेत शिक्षका बाबत अनेकदा आवाज उठवला . मात्र गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला . तरी पण ते शिक्षकांचे कामे करत होते . कोरोनाच्या प्रादुर्भावाने उल्हासनगर शहरात लॉक डाऊन झाला तरी पण त्यानी आपली कामे सुरुच ठेवली होती  . परंतु त्याना कोरोना संसर्गाने ग्रासले तेव्हा त्याना मुलूंड येथिल फोर्टिज हॉस्पिटल मध्ये उपचारा करिता आखल केले होते . पण आज अखेर सकाळी त्यांची प्राण ज्योत मावळली  असुन त्यांच्यावर ठाणे येथिल दादोजी कोंडदेव स्टेडियम समोर असलेल्या जवाहर बाग स्मशानभूमीत शासकिय नियमा प्रमाणे अंतिम संस्कार करन्यात आले आहेत .

संबंधित पोस्ट