महावितरण समस्या सोडवण्यासाठी डॉ नितीन राऊत याना दिले निवेदन .

उल्हासनगर / प्रतिनिधी :  उल्हासनगर-४ आणि उल्हासनगर-५, व प्रभाग क्रं.१८ येथील महावितरण विभाग अंतर्गत नागरिकांना भेडसावत असलेल्या प्रश्न व प्रलंबित कामे पूर्ण करण्याबाबत  काँग्रेसचे महासचिव रोहित साळवे यांनी महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ.  नितीन राऊत यांची  महावितरण कार्यालय  मुंबई येथे भेट घेतली व त्यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करून महावितरण बाबत  लक्ष वेधले  तेव्हा  मंत्री साहेबांच्या कार्यालयातून सदर विषया  संदर्भात तात्काळ बैठक लावण्याची  सूचना कल्याण परिमंडळचे मुख्यअभियंता अग्रवाल करण्यात आल्या तेव्हा महावितरणच्या कल्याण कार्यालयात अग्रवाल  अध्यक्षेते खाली सर्व संबंधित विभाग अधिकारांच्या समक्ष बैठक पार झाली  ज्या मध्ये काँग्रेस गटनेत्या अंजली साळवे व रोहित साळवे यानी आपल्या मांगण्या अवगत सादर केल्या गायकवाड पाडा येथे प्रस्तापित ( सब स्टेशन १००० केव्ही )चे काम पूर्ण करण्यात यावे.  उल्हासनगर-४ येथे प्रस्तापित नवीन स्विचिंग स्टेशन याचेकाम लालसाई गार्डनच्या बाजूलाअसलेल्या खुल्या भूखंडवर  किंवा स्वर्गद्वार स्मशानभूमी यांच्या भूखंडावर उभारण्यात यावे.

उल्हासनगर शहरातील ज्या ही भागात म्हणजे भरतनगर ,सुभाष टेकडी लालचक्की भागात  अंबरनाथ स्विचिंग स्टेशन वरून विद्युत पुरवठा होतो तो बदलून उल्हासनगर मधुन करन्यात यावा तर शहरातील नागरिकांना लॉक डाऊन च्या अनुषंगाने वीज बिला मध्ये मोठ्या प्रमाणात  सवलत देण्यात यावी.

प्रभाग क्रं. १८ मधील हनुमान मंदिर परिसरात, व सुभाष टेकडी परिसरात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावे, काली माता मंदिर परिसरातील ट्रान्सफॉर्मेरची क्षमता वाढविण्या यावी. प्रभाग क्रं. १८ मधील सर्व जीर्ण व जुने झालेले वायरिंग आणि मिनी-पिलर्स बदलण्यात यावे.सुभाष टेकडी व भरतनगर परिसर जो महावितरण विभागाच्या तुटोद्यात ''ड" श्रेणीत आहे, त्यासाठीचा  सर्वे करून  वीज चोरी साठी अभियान घेण्यात यावे  व सदर विभागाला ''ब" श्रेणीत घेण्यात यावे.आर आणि एम या योजनेतील ठेकेदारांवर अंकुश लावून कामे करून घेण्यात यावी किंवा कारवाई करून त्यांना बदलण्यात  यावे . या मांगण्याचे निवेदन देन्यात आले आहे.तरी देखील वरील मागण्यांवर अंमलबजावणी करून त्या पूर्ण करण्यात आल्या तर उल्हासनगर ४ आणि ५ व प्रभाग क्रं. १८ मधील सर्व समस्या पुढील दहा वर्षांसाठी मार्गी लागून दूर होतील,अशी विनंती करण्यात आली आहे.तर या मागण्यांचा विचार करुन लवकरात लवकर मार्ग  काढन्यात  येईल व तातडीचे कामे १० दिवसात सुरु करण्यात यावेत असे आदेश  अग्रवाल यानी  सर्व संबधित  अभियंत्यांना  दिले आहेत  आणि सर्व प्रश्नांचे लेखी  उत्तर दोन दिवसात देण्याचे आदेशही दिले आहेत सदर बैठकीला महावितरण विभागा  तर्फे मुख्य अभियंता अग्रवाल  ,अधिक्षक अभियंता पेठकर  ,कार्यकारी अभियंता सांवत  उप कार्यकारी अभियंता विपर  व इतर संबंधित कर्मचारी उपस्तिथ होते.  तसेच काँग्रेसच्या  गटनेता व  नगरसेविका अंजली साळवे , महासचिव रोहित साळवे. व समाजसेवक संजय पाटील उपस्तिथ होते.

संबंधित पोस्ट