सुभाषनगरात सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था महिला व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय

उल्हासनगर (प्रतिनिधी) : सुभाषनगर उल्हासनगर कॅंप ३ पॅनल  .नं. ९. या परिसरात सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाल्याने तो धोकादायक  शौचालय केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सार्वजनिक शौचालयाला दरवाजे नाहीत तसेच शौचालयाचे भांडे सुध्दा तुटलेलीच आहेत आणि पाण्याची सोय नाही. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांची मात्र मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

उल्हासनगर महापालिका प्रशासन आणि नगरसेवक, मुकादम सफाई कामगार, यांचे मात्र दुर्लक्ष होत असून या सुभाषनगरात मात्र नेहमी विविध मुलभूत सुविधांची बोंब होत आहे. पॕनल नं .८. व. ९. सुभाषनगर या परिसरात रस्त्यावर नेहमी पाणी गळती होत असल्याने  भर रस्त्यात तळे निर्माण झाले असून डबक्यातून नागरिकांसह वाहनांना सुध्दा जावे लागत आहे.

उल्हासनगर महापालिका प्रशासन, स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

तर सुभाषनगरात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन सुध्दा गटारातून गेल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.तर या कडे महापालिका प्रशासनाने लक्ष घालुन नागरिकाना नागरी सुविधा देन्याची मांगणी समाजसेवक व पत्रकार अशोक शिरसाट यानी केली आहे .

संबंधित पोस्ट