उल्हासनगर येथिल डंपिंग ग्राउंड हटावच्या मागणीसाठी नगरसेवक झाले एकत्र . ३ सप्टेंबर पासून करणार आंदोलन
- by Rameshwar Gawai
- Aug 21, 2020
- 264 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर कॅंप ५ येथील डंपिंग ग्राउंडची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे , भाजप, साई , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी हे डंपिंग ग्राउंड हटविण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे , ही मागणी मान्य न झाल्यास ३ सप्टेंबर पासून हे नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते आपापल्या घरात बसून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
उल्हासनगर महानगरपालिके तर्फे झिरो गार्बेज, कचरामुक्त शहर करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत मात्र उल्हासनगर कॅंप ५ येथील डंपिंग ग्राउंडची समस्या अद्यापही कायम आहे , या डंपिंग ग्राउंडमुळे प्रचंड दुर्गंधी पसरणे, विषारी धुरामुळे वायू प्रदूषण होणे , मृत जनावरे डंपिंग ग्राउंडमध्ये टाकणे अशा प्रकारामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होणे या समस्यांमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे हे डंपिंग ग्राउंड हटविण्याच्या मागणी साठी अनेक वेळा उपोषणे , निदर्शने, ठिय्या आंदोलने करण्यात आली मात्र महापालिका प्रशासनाने डंपिंग ग्राउंड हटविले नाही .
आता भाजपचे पदाधिकारी अमर लुंड यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांना लेखी निवेदन देऊन डंपिंग ग्राउंड हटविण्याची मागणी केली आहे , हे डंपिंग ग्राउंड न हटविल्यास येत्या ३ सप्टेंबर पासून सध्याची कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि सोशल डिस्टनसिंगचे पालन करून आपापल्या घरात बसून आमरण करण्याचा इशारा दिला आहे , या उपोषणात नगरसेवक शेरी लुंड, भाजपचे नगरसेवक जमनादास पुरसवानी, प्रदीप रामचंदानी, मनोज लासी, किशोर वनवारी, नगरसेविका मीनाक्षी रवि पाटिल, साई पक्षाचे नगरसेवक, टोनी सिरवानी, गजानन शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक सतरामदास जेसवानी यांनी पाठिंबा दिला असून ते या आंदोलनात सामील होणार आहेत . या सोबतच या परिसरातील अनेक सामाजिक , धार्मिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे .
यासंदर्भात महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना विचारले असता ते म्हणाले की महापालिका प्रशासनाने हे डंपिंग ग्राउंड हटविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, या साठी नवीन भूखंड उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू असून मा. जिल्हाधिकारी यांच्या परवानगी नंतर पर्यायी व्यवस्था होईल. अस त्यानी सांगितल आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम