उल्हासनगर महापालिकेचे तत्कालिन नगररचनाकार संजीव कर्पे याना बेपत्ता होवुन चार वर्ष पुर्ण . तरी पण शोध नाही .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिकेचे तत्कालिन नगररचनाकार संजीव कर्पे हे कार्यालयीन कामा करिता पुणे येथे जात असतानाच वाटेतच खोपोली जवळुन अचानक ते गायब  झाले तेव्हा पासुन कर्पे यांचा शोध ना पोलिसानी घेतला ना महापालिकेने घेतला . हे सर्व गुलदस्त्याच राहिले असुन कर्पे यांचा शोध लावन्याची मांगणी उल्हासनगर येथिल जन समस्या निवारण सस्थेचे महासचिव मिलिंद कांबळे यानी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या कडे केले असुन तसे निवेदन सुध्दा त्यानी  उल्हासनगर चे प्रांत अधिकारी याना दिले आहे .

उल्हासनगर महापालिकेत संजीव कर्पे हे नगररचनाकार म्हणुन कार्यरत होते . त्यांच्या कारकिर्दीत व्यवस्थित कामे सुरु होते . तर शहरात काही भुमाफिया खोटे नकाशे मंजुर करन्या बाबत त्यांच्या वर दबाब देखिल टाकत असत पण ते अशाना थारा देत नव्हते . दरम्यान ते २० ऑगष्ट २०१६ रोजी महापालिकेच्या कामकाजा करिता पुणे येथील नगररचना कार्यालयात एका बैठकी साठी जात असतानाच ते खोपोली येथुन अचानक बेपत्ता झाले . तेव्हा त्यांच्या भावानी खोपोली पोलिस ठाण्यात संजीव कर्पे हरविल्याची तक्रार दाखल केली परंतु अद्याप पर्यंत त्याना शोध लागला नाही . तेव्हा कर्पे यांचा शोध लागला नसल्याने त्यांचा परिवार मात्र अजुन ही त्यांचा शोध घेत  आहे . दरम्यान नगररचनाकार संजीव कर्पे यांचा  शासनाने शोध घ्यावा या करिता उल्हासनगर जन समस्या निवारण सस्थेचे महासचिव मिलिंद कांबळे . रविंद्र केणे . दिनेश प्रजापती . ज्ञानेश्वर लोखंडे (सचिव . मुलनिवासी असंघटित कामगार एकता संघ) व नोवेल साळवे (सरंक्षक महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रिय सैनिक सस्था) यानी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री याना निवेदन पाठवले असुन त्यानी त्या निवेदनात म्हटले आहे की नगररचनाकार संजीव कर्पे याना बेपत्ता होवुन चार वर्ष झाले आहेत.  तेव्हा  शासनाने बेपत्ता शोध पथक तयार करुन कर्पे यांचा शोध लावन्याची मांगणी केली आहे . तर तसे निवेदन सुध्दा त्यानी उल्हासनगर प्रांत अधिकारी याना दिले आहे .

संबंधित पोस्ट