
सफाळा पोलिसांकडून मटका अड्डयावर कारवाई
- by Reporter
- Aug 19, 2020
- 856 views
पालघर (प्रतिनिधी) : पालघर तालुक्यातील सफाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चाफेनगर येथे मटक्याचा अड्डयावर धाड टाकून अशोक वाघेला व दिपक वाघेला दोघा आरोपींना अटक केली असून रोख रक्कम व मटक्याचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई सफाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्यावर नेतृत्वाखाली करण्यात आली असून या प्रकरणी आरोपींवर जुगार नियंत्रण कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिपोर्टर