उल्हासनगर महापालिकेची ऑन लाईन महासभा संपन्न .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे महापालिकेची एक ही महासभा संपन्न झाली नाही तेव्हा काल झुम ॲप वर ऑन लाईन महासभा घेन्यात आली तेव्हा या महासभेत शाळेचा भुखंड कोण हडप करत असुन या जागेच्या बाबत महासभेने माहीती देन्याची मांगणी  भाजपाचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी.  मनोज लासी यानी केली.  परंतु प्रभाग अधिकारी भगवान कुमावत याना व्यवस्थित माहीती देता आली नाही .

उल्हासनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तेव्हा पासुन महापालिकेची महासभा झाली नाही काल अखेर ऑन लाईन महासभा घेवुन काही विषयांवर चर्चा झाली . तर नुकतेच महापालिका शाळेची जागा कोणी तरी भूमाफिया हडप करत आहे हा  विषय मनसे सह शिवसेनेने उचलुन धरला असुन सभागृह नेते राजेंद्र चौधरी यानी सदर भूखंड कोण हडप करत आहे या बाबत महासभेत विचारणा केली . मात्र प्रभाग अधिकारी भगवान कुमावत यानी महापालिके कडे कोणती ही माहीती नसुन प्रांत कार्यालया कडुन माहीती घ्यावी लागेल असे सांगितले आहे . दरम्यान महापालिकेची असलेली शाळा व त्या शाळेच्या वर्ग खोल्यांची माहीती महापालिके कडे नसने ही दिर्भाग्यपुर्ण  बाब आहे . दरम्यान महासभा सुरु होताना ऑन लाईन जॉईंट होन्यास काही विलंब लागला . तर महासभेत अजुन काही विषय मंजुर करन्यात आले आहेत .

संबंधित पोस्ट