उल्हासनगरात खड्ड्याचे सांम्राज्य .कोरोनाच्या प्रादुर्भावाने खड्ड्या कडे दुर्लक्ष .
- by Rameshwar Gawai
- Aug 19, 2020
- 424 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला तेव्हा पासुन महापालिकेचे शहरातील सर्वच विषया कडे दुर्लक्ष झाले असुन निव्वळ कोरोनाच्या आजाराने शहरातील बऱ्याच समस्या स्थगित झाल्या आहेत . या मध्ये महत्वाचे म्हणजे दरवर्षी पावसाळ्या पुर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवन्यात येतात ते खड्डे या वर्षी बुजले नाहीत . त्यामुळे पावसामुळे सर्वत्र खड्ड्यांचे सांम्राज्य दिसुन येते .
उल्हासनगर शहरात मे पासुन कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला . तेव्हा महापालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे . तर दिवसे दिवस रुग्ण वाढत असताना महापालिका कोरोना ला हरवन्या करिता काम करत आहे . दरम्यान शहरातील प्रत्येक रस्ते खराब झाले असुन खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आहेत . तर दरवर्षी रस्त्यावरील खड्डे हे पावसा पुर्वी बुजवन्यात येतात परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावा मुळे बुजवन्यात आले नाही त्यामुळेच खड्डे पडले आहेत . दरम्यान महापालिका ही कोरोनाशी लढत आहे . तर दर दिवशी रुग्ण कमी कसे होतील हे काम सध्या महापालिका आयुक्त करत आहेत . मात्र पावसाने रस्त्यावर खड्डे सुध्दा मोठ्या प्रमाणात पडले आहेत . तर ते खड्डे सुध्दा भरने गरजेचे असुन वाहन चालकाना वाहन चालवताना तारेवरील कसरत करावी लागते . कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिका युध्द पातळीवर काम करत आहे . त्यामुळेच महापालिकेचे इतर समस्या कडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम