उल्हासनगरातील दुकाने दोन्ही बाजुने सुरु

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात लॉक डाऊन मुळे सर्वच व्यापारी मेटाकुटीला आले असुन सर्व व्यापार ठप्प झाले आहेत . त्यामुळे महापालिकेने व्यापाऱ्यांचा विचार करत दोन्ही बाजुनी दुकाने सुरु करन्याचा निर्णय घेवुन दुकाने सुरु झाली आहेत . दरम्यान फिजिकल डिस्टंसिंग ठेवुन दुकानदाराने दुकाने सुरु करुन आपला व्यवहार सुरु केला आहे .

उल्हासनगरात सध्या कोरोना रुग्णांचा बरे होन्याचा आकडा एकदम सुधारला आहे . त्यामुळे शहरात लॉक डाऊन ऐवजी अन लॉक सुरु आहे . या पुर्वी एका बाजुने म्हणजे सम पध्दतीने दुकाने सुरु करन्याचा आदेश महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी यानी दिला होता तेव्हा शहरातील व्यापाऱ्यांचे संघटन असलेले यु टी ए चे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती . कार्याध्यक्ष दिपु शितलानी यानी आयुक्तांची भेट घेवुन दुकाने नियम व शर्ती नुसार दोन्ही बाजुने सुरु करावे अशी मांगणी केली होती . त्यामुळे आयुक्तानी सुध्दा त्यांच्या मांगणीचा विचार करुन दुकाने दोन्ही बाजुने सुरु करन्याचा आदेश दिला आहे . त्यामुळे दुकाने आता दोन्ही आजुने सुरु झाली असुन ग्राहकानी सुध्दा गर्दी करने सुरु केले आहे कारण गणेशोत्सव हा तीन दिवसा वर येवुन ठेपला आहे म्हणुन ग्राहक देखिल खरेदी साठी बाहेर पडले आहेत . दरम्यान कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९४ टक्क्यावर आले असल्याने दिवसा गणिक रुग्ण कमी होत आहेत . म्हणुन कोरोना ने पुन्हा शिरकाव करु नये याची दक्षता नागरिकानी घेतली पाहिजे . तर लॉक डाऊन हा सुरुच राहणार आहे पण या मध्ये जवळपास पुर्ण पणे शिथिलता दिली आहे .


संबंधित पोस्ट