
उल्हासनगर कँप नंबर ४ येथील मुक्तीबोध स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य.
- by Rameshwar Gawai
- Aug 18, 2020
- 1313 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर कम्प नंबर -४ येथील मुक्तीबोध स्मशानभुमीत घाणीचे साम्राज्य पसरले असून याकडे कमिटी व मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने काल शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतिने संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छ करण्यात आली आहे .
मनसेचे संजय नार्वेकर हे मुक्तीबोध स्मशानभूमीत
आपल्या मित्राच्या वडीलाला अग्नी संस्कार देण्यासाठी आले असता तेथील परिस्थिती बघता ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य व पावसाच्या पाण्यामुळे जमलेले शेवाळ तसेच अग्नीदाहसाठी ओली लाकडे ही संपूर्ण परिस्थिती बघून यांचे मन हेलावून गेले. माणसाच्या आयुष्याचा प्रवास संपून जेथून इहलोकाचा प्रवास सुरु होतो त्या स्मशानात सुध्दा सुविधा नाहीत त्यामुळे ते अत्यंत दुखी झाले. त्यांनी त्यांच्या शिवशंभू प्रतिष्ठान चे अध्यक्ष छोटू वारंग यांच्याशी चर्चा करुन त्याचे मित्र , विशाल जाधव, अमित बांदेकर, विष्णू शेट्टी, मनोज चिंचणकर संतोष मित्री यांना सोबतीला घेवून स्वखर्चाने स्मशानात ब्लिचिंग पावडर टाकुन स्वच्छ केली आहे जेणेकरुन अग्नी संस्कार करण्यासाठी येणाऱ्याना त्रास होऊ नये ही माणुसकी दाखवत त्यांनी संपूर्ण स्मशानभूमी स्वच्छ केली. यां गंभीर बाबीकडे स्मशानभूमी ट्रस्ट आणि व महापालिकेच्या प्रभाग समितीतील कर्मचाऱ्यानी या वास्तुची स्वच्छता ही वेळोवेळी करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे . दरम्यान उल्हासनगर शहरात चार स्मशानभुमी असुन ह्या चार ही स्मशानभुमी ट्रस्टींच्या ताब्यात आहेत त्यामुळे महापालिका या मध्ये कोणता ही हस्तक्षेप करत नाही . उलट महापालिका या चार ही स्मशानभुमीना निधी देत असते . तर लाकडाचे देखिल पैसे याना मिळतात . परंतु हे ट्रस्टी या स्मशानभुमी कडे जरा ही लक्ष देत नाहीत . म्हणुनच या स्मशानभुमीची अशी दयनिय अवस्था आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम