प्रेरणा फाऊंडेशन आयोजित कॅन्सरग्रस्त अचला पाटील हीच्या उपरासाठी मदतनिधी ऑनलाईन स्पर्धा संपन्न ..!

कोरोना काळात प्रेरणा फाऊंडेशनने आत्ता पर्यत विविध प्रकारच्या ११स्पर्धांचे मोफत आयोजन केले होते. यावेळची १२वी स्पर्धा १५ऑगस्ट या स्वातंत्र्य दीनाचे औचित्य साधून दोडा मार्ग, सिंधुदुर्ग जिल्हा येथील गरीब कुटुंबातील कॅन्सरग्रस्त मुलगी अचला पाटील हिच्या उपचारासाठी निधी संकलनाच्या दृष्टिकोनातून राज्यस्तरीय "समाजसेवक-समाजसेविका "अभिनय स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत विविध भागातुन स्पर्धकांनी भाग घेतला होता. तसेच काही दानशुर व्यक्तींनीही मदत केली.जमा झालेला निधी व प्रेरणा फाऊंडेशनच्या आर्थिक सहभागासह कॅन्सरग्रस्त मुलीच्या उपचारासाठी सुपूर्त करण्यात येईल.या समाजसेवक अभिनय स्पर्धेत अवधुत शेलार,यशवंत मुसळे, निवेदिता खासनिस,प्रतिक्षा शिंदे, ज्योती शिंदे, जीवन महिरे,रसिका शिंदे, दिपाली जोशी,अंजना प्रधान,कृष्णा गवस यांनी सहभाग घेतला.ग्रामीण भागातील काही स्पर्धकांना जास्त प्रमाणातील पाऊस नेट व रेंजच्याअडचणी मुळे सहभाग घेऊ शकले नाहीत.याप्रसंगी दीप्ती (प्रेरणा) गांवकर, हिरामण कचरु मनोहर, खंडु कोटकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहीले.सर्वच स्पर्धकांनी विविध प्रकारच्या समाजसेवकाच्या भुमिकेतील सहज सुंदर असा अभिनय सादर केला. फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रेरणा गांवकर यांच उत्कर्ष नियोजन,तसेच सचिव वैभव कुळकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन डीजिटल प्रमाणपत्र देण्यात आली. तसेच सढळ हस्ते मदत करणा-या व्यक्तींचेही आभार मानण्यात आले.

संबंधित पोस्ट