उल्हासनगर मध्ये शाळेची जागा हडपन्याचा प्रयत्न. आयुक्त गुन्हा दाखल करणार . मनसेची निदर्शने

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर कॅंप २ येथिल बेवास चौकात असलेली महापालिकेची राणी लक्ष्मीबाई ही शाळा येथील भुमाफिया यानी हडप करन्याचा प्रयत्न मनसेने हाणुन पाडला असुन सदर जागा हडप करणाऱ्या भुमाफियावर गुन्हा दाखल करन्याची मांगणी मनसेचे शहर अध्यक्ष बंडु देशमुख व मनोज शेलार यानी आयुक्ता कडे केली असुन त्यानी आयुक्तांच्या दालना समोर निदर्शने सुध्दा केली तेव्हा आयुक्त हे सुध्दा आक्रमक झाले असुन लवकरच त्या भुमाफियावर गुन्हा दाखल करन्यात येइल असे आश्वासन आयुक्तानी दिले आहे 
 
उल्हासनगर महानगरपालिकेची स्वतःच्या मालकीची शाळा क्र. ३  राणी लक्ष्मीबाई विद्यालय बेवास  चौक उल्हासनगर-२  या परिसरात असून या शाळेतील काही वर्ग रस्त्याच्या समोरील बाजूस भरत होते.
परंतु पटसंख्या कमी झाल्याने ती शाळा बंद च होती . तर ती शाळा महापालिकेची  असुन  ती शेवटपर्यंत महापालिकेची राहील असे फलक मालमत्ता विभागा च्या  प्रमुख सौ विशाखा सावंत यांनी बंद असलेल्या शाळेच्या ठिकाणी लावले होते. परंतु

हे फलक असताना सुद्धा काही भूमाफियांनी शाळेतील काही ही शालेय वस्तू एम एच  ० ५  बी एच ३८४२  या गाडीत चोरून घेऊन गेले आहेत.

अशा  गुन्हेगारांवर  फौजदारी गुन्हे दाखल करून  कठोर कारवाई  करण्यात यावी  तसेच या  प्रकरणाच्या संबंधित प्रशासकीय शिक्षणाधिकारी, मालमत्ता विभाग. प्रभाग अधिकारी, बिट मुकादम व अभियंता शिक्षण विभाग यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करावे जेणेकरून भविष्यात अशी घटना घडणार नाही व काही भूमाफिया शासकीय मालमत्ता गिळकुंत करणार नाही असे आयुक्ताना सांगण्यात आले.

त्यावर आयुक्त डॉ . राजा दयानिधी  या सर्व प्रकाराची दखल घेत या प्रकरणाच्या संबंधित गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे दाखल करतो असे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले आहे.
 परंतु जर संबंधितावर कारवाई नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल व निर्माण होणाऱ्या तणाव पुर्ण  परिस्थितीस सर्वस्वी उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल असा इशारा मनसे शहर अध्यक्ष  बंडू देशमुख व मनविसे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी दिला आहे.  त्यावेळी मनसे जिल्हा सचिव संजय घुगे, शहर सचिव नाना सोनवणे, शहर उपाध्यक्ष सुभाष हटकर, विभाग अध्यक्ष  अनिल गोधडे व सुहास बनसोडे, मनविसे शहर संघटक अशोक गरड, शहर सचिव सचिन चौधरी, सहसचिव तन्मेष देशमुख, महाराष्ट्र सैनिक रवी अहिरे लड्डन रेन.  यश पाटील उपस्थित होते.

संबंधित पोस्ट