उल्हासनगर शहर कोरोना मुक्तीच्या दिशेने. लवकरच शहर होणार कोरोना मुक्त .
- by Rameshwar Gawai
- Aug 16, 2020
- 742 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात सुरवातीला कोरोना च्या प्रादुर्भावाने नागरिक भयभित झाले होते.परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागाने आणि शासकिय यंत्रणेने या कोरोनावर प्रभावी इलाज करुन शहराला कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर आणुन ठेवले आहे . सध्या कोरोना बाधितांचा आकडा पाहता शहर लवकरच कोरोना मुक्त होणार आहे . आता ७३२९ रुग्णा पैकी २९४ रुग्ण फक्त शहरातील तीन कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत . तेव्हा चार ते पाच दिवसात हे रुग्ण देखिल बरे होवुन घरी येतील तेव्हा उल्हासनगर शहर हे कोरोना मुक्त होणार आहे .
उल्हासनगर शहरात सुरवातील कोरोना चा एक ही रुग्ण नव्हता . परंतु मे महिन्या पासुन कोरोना बाधितांचे आकडे वाढत गेले आणि दर दिवशी पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढतच होता . दरम्यान या कोरोना मुळे दोन महापालिका आयुक्तांच्या बदल्या देखिल झाल्यात .शासनाने सरळ विदर्भातील गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले व प्रशासकिय सेवेतील अधिकारी डॉ . राजा दयानिधी यांची उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त पदी विराजमान करुन कोरोनाशी युध्द करन्यास सज्ज केले . तेव्हा डॉ दयानिधी यानी सुध्दा शहरातुन कोरोनाला हद्दपार करन्याचा विडा उचलुन चांगली व्युव्हरचना आखुन कामाला सुरवात केली . त्यानी आयुक्त पदाची सुत्रे हातात घेताच शहरातील सर्व मुख्य रस्ते व प्रत्येक झोपडपट्टीतील रस्ते हे सॅनिटायझरिंग करुन स्वच्छ केले तर धारावी पॅटर्न प्रमाणे आरोग्य विभागाची टिम तयार करुन नागरिकांच्या तपासण्या सुरु केल्या तर महापालिकेचे वैद्यकिय अधिकारी डॉ . सुहास मुहनाळकर आजारी पडल्याने विदर्भाच्याच अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर शहरामध्ये असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ . दिलीप पगारे याना शासना मार्फत प्रतिनियुक्तीवर बोलवले . दरम्यान आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शना खाली वैद्यकिय अधिकारी दिलीप पगारे . मुख्य आरोग्य निरीक्षक विनोद केणे . जन संपर्क अधिकारी युवराज भदाणे डॉ राजा रिजवानी . मनिष हिवरे . डॉ अनिता जगताप आणि यांचे सर्व सहकारी यानी शहराला कोरोना मुक्त करन्या करिता काम सुरु केले . शहरात असलेले कोविड केयर सेंटर . डेडीकेट कोविड हेल्थ सेंटर . डेडीकेट कोविड हॉस्पिटल या वर लक्ष केंद्रित करुन रुग्ण बरे कसे होतील हे प्रयत्न केले . तर तपासण्या व्यवस्थित रित्या करुन रुग्णांची संख्या दिवसे दिवस कशी कमी होणार हा देखिल प्रयत्न केला आहे . त्यामुळे सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता दिवसा गणिक कमी होत चालली आहे . त्यामुळे आता उल्हासनगर शहर हे कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे . सध्या शहरातील तीन ही रुग्णालयात फक्त २९४ रुग्ण उपचार घेत असुन ते ही लवकरच बरे होवुन घरी येणार असुन शहर कोरोना मुक्तीची घोषणा सुध्दा आयुक्त डॉ . राजा दयानिधी हे करतील अशी स्थिती निर्माण झाली आहे .

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम