उल्हासनगर येथिल समाजसेवक विशालकुमार गुप्ता यांचा शासना कडुन कोरोना योध्दा प्रमाणपत्र देवुन गौरव .

उल्हासनगर / प्रतिनिधी :  कोरोना महामारीच्या काळात अनेक समाजसेवी सस्थानी गोर गरीबाना मदत करुन त्याना जिवनावश्यक वस्तुचे वाटप केले आहे . तेव्हा परहित चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यानी वरप कांबा येथील सर्वच आदिवासी पाड्यावर जाऊन लॉक डाऊन काळात व अन लॉक मध्ये ही तेथील आदिवासीना गेल्या सहा महिन्या मध्ये कपडे . धान्य .औषध आणि विविध साहित्याचे वाटप अविरहत सुरु ठेवले . त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेवुन त्याना कोरोना योध्दा हे प्रमाणपत्र देवुन गौरविन्यात आले आहे . 


उल्हासनगर कॅंप ३ येथिल सी ब्लॉक या परिसरात राहणारे परहित सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता हे वरप कांबा येथिल आदिवासींच्या जमीनी उल्हासनगर च्या काही भुमाफिया यानी बोगस शेतकरी असल्याचे दाखवुन बेभावाने खरेदी केल्या आहेत तेव्हा त्या जमीनी आदिवासीना परत मिळाव्या म्हणुन विशालकुमार गुप्ता हे या भुमाफिया व जमीन हडपु माफिया यांच्या विरुध्द शासन स्थरावर लढा देत आहेत . त्यानी जमीन हडपु माफिया याना मदत करणाऱ्या  ठाणे जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक याना थेट दिल्ली येथिल राष्ट्रिय अनुसूचित जाती जमाती आयोगा पुढेच उभे केले आहे . दरम्यान मार्च पासुन कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन सुरु झाला तेव्हा गुप्ता यानी या आदिवासी पाड्यांवर जावुन त्या आदिवासी ना कोणत्या वस्तुची कमी पडु दिली नाही . तर गेल्या सहा महिन्या पासुन त्यानी या आदिवासी बांधवाना धान्य कपडे आणि इतर जिवनावश्यक वस्तुचे वाटप अविरहत पणे सुरुच ठेवले तर या आदिवासी पाड्यांवर यांच्या आरोग्याची काळजी घेत अनेकदा आरोग्य शिबिरे लावुन त्यांच्या तपासण्या करवुन घेतल्या आहेत . त्यामुळे गुप्ता यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आहे . तेव्हा कोरोना काळात चांगले कार्य केले म्हणुन शासनाने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन विशालकुमार गुप्ता याना कोरोना योध्दा हे प्रमाणपत्र कल्याण तहसिलदार दिपक आकडे यांच्या हस्ते देवुन गौरविण्यात आले आहे . 

संबंधित पोस्ट