उल्हासनगर येथिल वादग्रस्त प्लॅटिनम हॉपिटलच्या कर्मचाऱ्यावर मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर येथिल वादग्रस्त कोविड प्लॅटिनम हॉस्पिटल या ना त्या कारणाने वादात सापडले असुन आता याच रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने त्या रुग्णालयात उपचारा करिता दाखल असलेला रुग्ण मृत्यु झाल्यावर त्याचा मोबाईल चोरल्याचा गुन्हा येथिल मध्यवर्ती पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे . 

उल्हासनगर येथिल शांतीनगर परिसरात प्लॅटिनम हॉस्पिटल असुन या रुग्णालयात कोरोना वर उपचार होतात . तेव्हा अंबरनाथ पुर्व येथिल बी कॅबिन येथे राहणारे बाबुराव वामन जगताप यांचा मुलगा दिपक जगताप हा कोरोना झाल्याने त्याला प्लॅटिनम हॉस्पिटल मध्ये उपचारा करिता दाखल झाला होता . तेव्हा दिपक याचा दि . १/७/२०२० रोजी मृत्यु झाला परंतु दिपक याला उपचारा करिता दाखल करताना त्याच्या वडीलानी त्याच्या कडे ओपो कंपनीचा व १५ हजार रुपये किमंतीचा मोबाईल दिला होता . परंतु दिपक चा मृत्यु झाल्याने त्याच्या कडे असलेला मोबाईल गायब झाल्याचे त्याचे वडील बाबुराव जगताप यांच्या निदर्शनास आले . तेव्हा त्यानी मुलाच्या मोबाईल विषयी रुग्णालय प्रशासनाला विचारले असता रुग्णालय प्रशासनाने सरळ हात वर केले . तेव्हा बाबुराव जगताप यानी मुलाचा मोबाईल प्लॅटिनम हॉस्पिटल येथिल कोणी तरी कर्मचाऱ्यानी चोरला असल्याची तक्रार मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली . त्यामुळे मोबाईल चोरीचा तपास मध्यवर्ती पोलिसानी सुरु केला . तेव्हा प्लॅटिनम हॉस्पिटल मध्ये काम कारणारा प्रविण भास्कर कांबळे या कर्मचाऱ्याने तो मोबाईल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे . त्यामुळे प्रविण कांबळे वर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात बाबुराव जगताप यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करन्यात आला आहे . तर तो मोबाईल अद्याप तरी हस्तगत करन्यात आला नाही मात्र पुढील तपास पोलिस करत आहेत .

संबंधित पोस्ट