गेहलोत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला सचिन पायलट यांची पूर्ण साथ

जयपूर (प्रतिनिधी) : आजपासून सुरु झालेल्या राजस्थान विधानसभेत भाजपाने काँग्रेस सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला होता. मात्र मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकत भाजपाला जोरदार झटका दिला आहे. जवळपास महिनाभर चाललेल्या राजकीय अनिश्चिततेनंतर पक्षश्रेष्ठींनी सचिन पायलट यांची समजूत काढल्याने राजस्थानमधील राजकीय नाट्य संपुष्टात आले होते. मात्र राजस्थानमध्ये सारे आलबेल झाले असे वाटत असतानाच भाजपाने खेळलेल्या एका चालीमुळे राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आला होता. राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता. मात्र सरकारविरोधातील अविश्वास ठराव भाजपा हरलं आहे.

सचिन पायलट पुन्हा पक्षात परतल्याने गेहलोत सरकारवरील अस्थिरतेचं संकट टळलं होतं.विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सचिन पायलट यांनी आपण चांगल्या बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकलो असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.विरोधकांनी अनेक प्रयत्न करुनही आमच्या सरकारच्या बाजूने निर्णय लागला असल्याचंही ते म्हणाले आहेत.गांधी कुटुंबाची भेट घेटल्यानतंर सचिन पायलट यांचं बंड शमलं आणि अशोक गेहलोत यांच्यासमोरील संकटही टळलं. गुरुवारी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेत समेट झाल्याचंही दर्शवलं होतं. अशोक गेहलोत सरकारने विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे, गेहलोत सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याचं भाजपने जाहीर केलं होतं.

संबंधित पोस्ट