
साई प्लॅटिनम कोविड हॉस्पिटल उल्हासनगर करिता न भेदता येणारे चक्रव्यूह .
- by Rameshwar Gawai
- Aug 13, 2020
- 815 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने उल्हासनगर महानगर पालिकेने साई प्लॅटिनम हॉस्पिटल ला सोबत घेऊन कोवीड साई प्लॅटिनम रुग्णालय सुरु केले आहे मात्र हे रुग्णालय सुरवात पासुन च वादात सापडले आहे . या रुग्णालयाला महानगर पालिकेने मदत केली आहे तर या रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत रुग्णाना मोफत उपचार मिळावे म्हणुन ही योजना देखिल सुरु केली होती . परंतु रुग्णालय प्रशासनाने ती योजना बंद केले आहे. तर हे रुग्णालय प्रशासन रुग्णा कडुन बिल तर वसुल करतेच पण त्या रुग्णाच्या नावाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेतुन सुध्दा बिल वसुल करत असल्याचा आरोप नगरसेवक शेरी लुंड यानी केला आहे .
दरम्यान या रुग्णालयात जो ही रुग्ण उपचारा करिता दाखल होतो त्याच्या कडुन प्रथम च डिपॉझिट म्हणुन काही रक्कम जमा करुन घेन्यात येते .तर कोरोना रुग्णांना आरोग्य सेवा मोफत देण्या ऐवजी रुग्णांकडून शासनाच्या आरोग्य अधिनियम विभागाने ठरवून दिलेल्या बिला ऐवजी अधिक दराने बिल वसुल केली आहेत.
आता पर्यंत कोवीड साई प्लॅटिनम हॉस्पिटल मध्ये दोन ते अडीच महिन्यात ७०० रूग्णांवर उपचार केला असे डॉक्टर संजीत पॉल यांचे म्हणणे आहे. तर
रुग्णालयात कोरोना चाचणी लॅब असून इतर रूग्णांवर उपचार करून शस्त्रक्रिया सुध्दा केली जाते. इतर सरकारी व खाजगी लॅब मध्ये नाक व घशातुन स्वॅब घेतला जातो ;मात्र आम्ही फुफ्फुसात नळी घालून स्वॅब घेतो. त्यामुळे निश्चित निदान होत असल्याचे डॉ. पॉल यांचे म्हणणे आहे. तर
डॉ.पॉल यांच्या म्हणण्या अर्थ असा घ्यावा कि राज्यात व देशात जी कोरोना टेस्ट करिता नाकातून व घश्यातुन स्वॅब घेण्याची पद्धत आहे ती निश्चित निदान देत नाही. डॉ.पॉल हा छक्के पंजे करण्यात फार मातब्बर आहेत. तर हे रुग्णांच्या फुफ्फुसात नळी घालून स्वॅब घेण्याची पद्धत फार किचकट व खर्चिक व जोखीम युक्त पद्धत आहे.कारण नळी जेव्हा फुफ्फुसात स्वॅब घेण्याकरिता टाकली जाते ती फुफ्फुसात नवीन इंज्युरी,अथवा इन्फेकशन तयार करू शकते याची शक्यता नाकारता येत नाही असा आरोप समाजसेवक मिलींद कांबळे यानी केला आहे .
७०० रुग्णांकडून न जाणे किती रकमेची बिल साई प्लॅटिनम हॉस्पिटल व्यवस्थापनाने वसुल केली याची महानगर पालिका आयुक्त नी आपल्या भरारी पथका मार्फत चौकशी करावी व दोन्ही बाजूनी पैसे काढणाऱ्या साई प्लॅटिनम हॉस्पिटल वर मेस्मा कायद्या अंतर्गत कारवाई करावी. जर साई प्लॅटिनम हॉस्पिटल ऐन कोरोना महामारी काळात जनतेला आरोग्य सेवा देण्या ऐवजी रुणांचे खिसे रिकामे करत असेल तर या साई प्लॅटिनम हॉस्पिटल ने आज पर्यंत किती लूट केली असेल याची जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा लेखा अधिकारी, राज्य आरोग्य नियामक बोर्ड या सदस्यांनी याचे लेखा परीक्षण करावे कारण महानगर पालिकेच्या अधिकारी कर्तव्यदक्ष, मेहनती, प्रामाणिक आहेत याबाबत तिळमात्र शंका नाही. परंतु राजकीय दबावाखाली कामकाजात पारदर्शकता येत नाही. असा ही आरोप मिलींद कांबळे यानी केला आहे . दरम्यान या हॉस्पिटल विरुध्दात सुरवात पासुन समाजसेवक शिवाजी रगडे यानी आवाज उठवला असुन नगरसेवक शेरी लुंड यानी सुध्दा या रुग्णालयावर आरोप करुन हे रुग्णालय कशा प्रकारे रुग्णा कडुन पैसे उकळते याचे उदाहरण दिले आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम