उल्हासनगर वंचित बहुजन आघाडीचे तहसील कार्यालया बाहेर डफली बजाओ आंदोलन.

उल्हासनगर (प्रतिनिधी) : कोरोना  माहामारीला आटोक्यात आणन्या साठी  शासनाने लाँकडाऊन सुरु केला आहे या लॉकडाऊन  मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला ठाकरे सरकारने एसटी महामंडळाची बस सेवा,व शहरातील वाहतुक सेवा त्वरीत सुरु करण्याची अनुमती दयावी.या मुख्य मागणीसाठी काल  वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उल्हासनगर तहसील कार्यालया  समोर डफली बजाओ आंदोलन करण्यात आले.

गेल्या पाच महीन्या पासुन  कोरोना माहामारीमुळे लाँकडाऊन सुरु असल्याने अनेक नागरीकांची आर्थिक स्थीती बिकट झाली आहे.सदर गंभीर बाबीचा विचार करुन ठाकरे सरकारने महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या बसेस व शहरातील सर्व वाहतुक सेवा त्वरित सुरु कराव्या.या मुख्य मागणीसाठी काल  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष  अँड.प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने ठाणे जिल्हयाचे नेते सारंग थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर तहसील कार्यालया- समोर जोरदार घोषणाबाजी करत डफली बजाओ आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शेषराव वाघमारे,डॉ.जानु मानकर,किशोर पाटील,शिवाजी वाघ,संगीता नेतकर,
 प्रकाश सिरसाट,बाळासाहेब अहीरे,रामचंद्र जयस्वाल, अँड.मनिषा झेंडे,उबाळे, दिपक पगारे,सुर्यकांत झेंडे,

यांच्या सह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित पोस्ट