पत्रकार प्रकाश सोनावणे यांना मातृशोक.

उल्हासनगर (प्रतिनिधी) : येथील हिंद- माता मिरर या वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रकाश सोनावणे यांची आई निर्मलाबाई शालीग्राम सोनावणे (५२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे .

निर्मलाबाई शालीग्राम सोनावणे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांचा मुलगा पत्रकार प्रकाश सोनावणे यांनी तातडीने त्यांना उल्हासनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यास आणले होते, तब्बल ५  खाजगी रुग्णालयात त्यांनी निर्मालाबाई यांना उपचारासाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र या रुग्णालयात उपचारासाठी वेगवेगळी कारणे देत त्यांना दाखल करण्यास नकार देण्यात आला, शेवटी सत्य साई  प्लॅटिनम या रुग्णालयात त्यांना दाखल करून घेतले मात्र तो पर्यंत त्यांची प्रकृती खालावली होती.
     
पत्रकार सोनू शिंदे, सॅमसन घोडके, सामाजिक  कार्यकर्ते शिवाजी रगडे, मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, शिवसेना नगरसेवक राजेंद्र चौधरी, अरुण आशान यांनी निर्मलाबाई सोनावणे यांना तातडीने उपचार मिळावेत म्हणून शर्थीचे प्रयत्न केले मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती,  इतर रुग्णालयात घेऊन जाण्यात व तेथे उपचारासाठी ताटकळत ठेवल्याने  सुमाारे २  तास वाया गेले, माझ्या आईला वेळेवर उपचार मिळाला असता तर त्यांचे प्राण वाचू शकले असते असे प्रकाश सोनावणे यांचे म्हणणे आहे .

निर्मलाबाई सोनावणे त्यांच्या कुटुंबासह बदलापूर (प) ग्रीन पार्क या ठिकाणी राहत होत्या, त्यांच्या पश्चात पती शालीग्राम सोनावणे, मुलगा , सून ,दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे .  निर्मलाबाई सोनावणे यांना पत्रकार , सामाजिक, राजकीय व इतर क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींकडून श्रद्धांजली वाहण्यात आली .

संबंधित पोस्ट