आमदार प्रमोद (राजू ) पाटील यांच्या कडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पी.पी.ई. किट चे वाटप .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : मनसेचे  आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्याकडून उल्हासनगर मनपाच्या डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आज पी पी ई किट देण्यात आले आहे, .मनसेच्या स्थानिक नेत्यांच्या वतीने मनपा उपायुक्त मदन सोंडे यांच्याकडे या पीपीई किट देण्यात आल्या आहेत

कोरोना महामारीच्या काळात  या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या कोविड सेंटर मधील कर्मचाऱ्यांसाठी मनसेने सुरक्षा साधनांचे वाटप केले आहे. मनसेचे नेते कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या माध्यमातून कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात असलेल्या सर्व सरकारी कोविड सेंटरमधील कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका यांच्यासाठी पीपीई किटचे वाटप करण्यात आले आहे, याचाच एक भाग म्हणून उल्हासनगर महापालिकेच्या कोविड सेंटर साठी २५ बॉक्स पीपीई किट देण्यात आले.जिल्हा अध्यक्ष सचिन कदम, शहर अध्यक्ष बंडू देशमुख , उपजिल्हा अध्यक्ष प्रदिप गोडसे,उपजिल्हा सचिव संजय घुगे, मनविसे चे  शहर अध्यक्ष मनोज शेलार, शहर सचिव शालिग्राम सोनवणे,उपशहर अध्यक्ष शैलेश पांडव, सुभाष हटकर, कामगार नेते दिलिप थोरात यांनी सदरचे पीपीई किट उल्हासनगर महापालिकेचे मुख्यालय उपायुक्त मदन सोंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. दरम्यान मुख्यालय उपायुक्त मदन सोंडे यांनी आमदार राजू पाटील यांचे आभार मानले. 

संबंधित पोस्ट