कोरोनावर मात केल्यानंतर अर्धांग वायुच्या झटक्याने पोलीस हवालदाराचा मृत्यू.

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर मधील मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत असणारे पोलीस शिपाई विजय बनसोडे (४९)  यांचे रविवारी निधन झाले , दोन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती , त्यावर त्यांनी मात केली मात्र नंतर त्यांना अर्धांग वायूचा झटका आला व त्यात त्यांचे निधन झाले . बनसोडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी ,एक मुलगी व मुलगा असा परिवार आहे .

दोन महिन्यांपूर्वी विजय बनसोडे यांना ताप आला असता त्यांची स्वॅब घेवुन कोरोना  टेस्ट करण्यात आली होती . त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना  ठाण्यातील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते,यावेळी त्यांनी कोरोनावर मात केली , त्यानंतर  त्यांना अर्धांगवायू चा झटका आला तेव्हा तातडीने  उल्हासनगर मधील मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,  मात्र प्रकृती खालावल्याने त्यांचा काल  मृत्यू झाला आहे ,बनसोडे हे पोलीस विभागात कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मागे पत्नि  एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे . 


संबंधित पोस्ट