
उल्हासनगरात रोशन कार्ड दुकानाला आग . लाखो रुपयाच्या लग्न पत्रिका जळुन खाक .
- by Rameshwar Gawai
- Aug 10, 2020
- 1767 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : वडापावच्या दुकानाला आग लागुन एक जण मेल्याची घटना ताजी असतानाच काल रात्री शिवाजी चौक येथिल प्रेस बाजारा मध्ये असलेल्या रोशन कार्ड या दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावर अचानक आग लाग लागली असुन ती आग अद्याप ही घुसमत असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या अजुन ही आग विझवन्याचा प्रयत्न करत आहेत . तर या आगीत जीवीत हानी झाली नसली तरी वित्तीय हानी मोठ्या प्रमाणात झाली असुन लाखो रुपयाच्या लग्न पत्रिका जळुन खाक झाल्या आहेत . दरम्यान तिसऱ्या माळ्यावर सर्वत्र पत्रिका व कागदाचे रिम असल्यांचे आग जास्त भडकली आहे . दरम्यान अग्निशमन दलाचे जवान काल रात्री पासुन आग आटोक्यात आणन्याचा प्रयत्न करत आहेत .
उल्हासनगर कॅंप ३ येथिल शिवाजी चौक जवळ प्रेस बाजार असुन या बाजारात रोशन कार्ड नावाचे लग्न पत्रिका विकन्याचे दुकान आहे . या दुकानामध्ये मुंबई ठाणे कल्याण कर्जत कसारा बदलापुर अंबरनाथ सह ग्रामिण भागातुन लग्न पत्रिका विकत घेन्या करिता लोक येतात या दुकानात कोऱ्या लग्न पत्रिका विकत घेतल्या तर ५० टक्के सुट मिळते त्यामुळे हे दुकान उल्हासनगरात प्रसिध्द आहे . दरम्यान काल रात्री ११ वाजता रोशन कार्ड या दुकानाच्या तिसऱ्या माळ्यावर अचानक आग लागली . तेव्हा शेजारी दुकानदारानी या आगीची सुचना अग्निशमन दलाला दिली असता उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेवुन आग विझवन्याचा प्रयत्न केला परंतु आग अधिकच भडकत होती कारण तिसऱ्या माळ्यावर लग्न पत्रिकाचे गठ्ठे व काही कोरे कागदाचे रिम असल्याने सदर आग जास्तच भडकली तर ही आग आटोक्यात आणन्या करिता अंबरनाथ व बदलापुर येथिल अग्निशमन दलाच्या गाड्याना सुध्दा पाचारण करन्यात आले होते. दरम्यान ही आग विझवन्या करिता शंभर पेक्षा अधिक पाण्याचे टॅंकर लागले तरी पण अजुन ही ही आग घुसमत आहे तर अग्निशमन दलाच्या गाड्या अद्याप ही त्या दुकाना समोर उभ्याच आहेत . तरी पण दुकानाच्या तिसऱ्या माळ्या वर अजुन ही धुर निघत आहे . तर या आगीत जीवीत हानी झाली नसली तरी वित्तिय हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली असुन या दुकानात विविध रंगाच्या लग्न पत्रिका जळुन खाक झाल्या आहेत .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम