उल्हासनगरातील भाजपाचे नगरसेवक महेश सुखरामानी यांचे जमीन हडप करण्याचे कारनामे .

उल्हासनगर / रामेश्वर गवई : उल्हासनगर येथिल भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश सुखरामानी यांचे  वरप कांबा जवळ असलेल्या आदीवासींच्या जमीनी हडप करण्याचे कारनामे उजेडात  आले असुन त्यानी शेतीचे खोटे दस्ताऐवज तयार करुन शेतकरी असल्याचे दाखले आणुन आदिवासींच्या जमीनी विकत घेण्याचा गोरख धंदा सुरु केल्याचा आरोप परहित चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्ष विशालकुमार गुप्ता यानी केला आहे.त्यानी आदिवासीना बेदखल करुन रस्त्यावर आणले आहे . 

उल्हासनगर जवळ असलेल्या वरप,कांबा येथिल आदिवासीच्या जमीनी खोटे शेतकरी असल्याचे दाखले तयार करुन जमीनी बेभावात विकत घेतल्या आहेत. तर नगरसेवक महेश सुखरामानी यानी भूमी प्रमाणपत्र हे किसान प्रमाणपत्र दाखवुन सर्वे न . १२०/१  १२१/१ ही जमीन खरेदी केली होती . परंतु या सर्वे नंबर ची जमीन ही सेंच्युरी कंपनीची निघाली आहे . तर ही जमीन ( एन ए प्लॉट ) कृषक असुन त्यांची स्टॅंप ड्युटी भरुन करुन त्यात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विशालकुमार गुप्ता यानी केला आहे . दरम्यान शासनांचे ही राजस्व न भरल्याने शासनाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन खोटे शेतकरी प्रमाणपत्र असल्याचे दाखवुन महेश सुखरामानी . सुरेश जयरामदास तलरेजा ,सतीश रमेशलाल तुनिया . यानी सर्वे न . १५/७ ही जमीन घेन्या करिता शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र व ७/१२ च्या साठी दिले असल्याचे माहीती अधिकारात उघड झाले आहे . तर सुखरामानी यानी म्हारळ गांव येथे ही शेतकरी असल्याचे भासवुन खरेदी केली असुन या जमीनीची तक्रार शासना कडे गेल्याने ती जमीन शासन जमा झाली आहे . मात्र त्याच जमीनीच्या कागदपत्रा च्या आधारे सुखरामानी यांचे साथीदार लाल नोतनदास तनवानी यानी सर्वे न . १२० /१ १२१/१ ही जमीन घेन्या करिता सर्वे न . १५/७ या जमीनीचे कागदपत्रे जमा केल्याचा आरोप गुप्ता यानी केला आहे.दरम्यान प्रकाश बुधरानी,लाल तनवानी,नरेश भाटिया,यश रावलानी यानी ७/१२ च्या आधारे वरप व कांबा मध्ये सर्वे न . १२०/१  १२१/१ ही जमीन खरेदी केली पण ती जमीन सेंच्युरी कंपनीची अकृषक जमीन असताना ती कृषक जमीन दाखवुन खरेदी केली परंतु त्या जमीनीची अनेकदा खरेदी विक्री झाल्याचे गुप्ता यानी उघड केले  आहे . त्यात करोडो रुपयाचा घोटाळा झाल्याचा ही आरोप करन्यात आला आहे.दरम्यान कल्याण तहसीलदार.प्रांत अधिकारी व जिल्हाधिकारी याना या बाबत अनेकदा तक्रारी केल्या आहेत तर राष्ट्रिय अनुसूचित जाती जमाती आयोगा पुढे सुध्दा हे प्रकरण गेले आहे तरी पण या आदिवासीना न्याय मिळाला नाही.त्यामुळे हे तीन ही अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.दरम्यान तहसीलदार दिपक आकडे यानी सांगितले आहे की या तक्रारीचे सर्व कागद पत्रे वरीष्ठांकडे पाठवले असुन त्यांचा आदेश प्राप्त होताच सदर जमीनी शासन जमा करण्यात येतील.तर या आदिवासीना न्याय मिळाला नाही तर मुंबई मंत्रालय त्या नंतर दिल्ली येथिल जंतर मंतर येथे व गरज भासल्यास संसद भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा विशालकुमार गुप्ता यानी दिला आहे

संबंधित पोस्ट