कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.यदियुरप्पा यांचा शिवसेनेकडून निषेध .

उल्हासनगर / प्रतिनिधी : कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात असलेल्या मनगुती गावामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा रातोरात हटवण्यात आला होता.हे निच कृत्य करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्री यदियुरप्पा यांचा निषेध करण्यात आला आहे .

भाजपाने  लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा व फोटोचा वापर करायचा तर दुसरीकडे त्यांचाच पुतळा रातोरात गायब करायचा अशा ह्या कर्नाटक च्या भाजपा मुख्यमंत्री यदियुरप्पा यांचा   शिवाजी चौक उल्हासनगर ३  येथे उल्हासनगर शिवसेना शहर शाखेच्या वतीने  सोशल डिस्टेन्स चे पालन करून  यदियुरप्पा यांच्या पुतळ्याला चपलाचा हार, व जोडो मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे .

शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी म्हणाले की भाजपा नेहमी दुटप्पी भुमिका घेत असून "मुह मै राम और बगलमैं छुरी" असे भाजपा करत असते म्हणून त्यांचा धिक्कार आम्ही करत आहोत असे म्हणाले.

यावेळी सभागृह नेता शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या समवेत, शिवसेना उपशहर राजेंद्र शाहु,नगरसेवक चंद्रशेखर यादव,युवासेना शहर प्रमुख बाळा श्रीखंडे संदिप गायकवाड, विभाग प्रमुख दिपक साळवे,ज्ञानेश्वर मरसाळे यांच्या सह शेकडो शिवसैनिक  उपस्थितीत होते.

संबंधित पोस्ट