
उल्हासनगरचा स्थापना दिवस उत्साहात साजरा .
- by Rameshwar Gawai
- Aug 08, 2020
- 1230 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर चा गौरवपूर्ण ऐतिहासिक दिवस म्हणजे ८ आगस्ट १९४९ रोजी उल्हासनगर शहराची स्थापना होवुन ७२ वर्ष झाली आहेत .तेव्हा हा दिवस स्थापना दिवस म्हणुन साजरा करन्यात येतो . तर महापालिकेच्या पाठीमागे असलेल्या स्थापना दिनाच्या कोन शिलिचे पुजन करुन शहरात उत्साहात साजरा करुन शहरवासीयाना शुभेच्छा देन्यात येतात .
सकाळी ११ वाजता महापालिकेचे महापौर लिलाबाई आशान , उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया , आमदार कुमार आयलानी ,उपायुक्त मदन सोंडे . जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे . सभागृह नेते राजेंद्र चौधरी जमनू पुरस्वानी मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम . उपजिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे . सुभाष हटकर पत्रकार नानिक मंगलानी . महेश रोकडे , सोनु हटकर समाजसेविका अनुष्का शर्मा यानी कोन शिलेचे दर्शन घेवुन त्याच ठिकाणी केक कापुन शहराचा ७२ वा वाढदिवस साजरा केला . दरम्यान या दिनाचा केक माजी नगरसेवक ठाकुर चांदवानी यानी नाशिक येथुन तयार करुन आणला होता .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम