उल्हासनगरात वडा पावच्या दुकानात सिलेंडर स्फोट आठ जखमी .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर कॅंप ४ येथील भारत डेअरीजवळ असलेल्या जय माता दि या वडापाव च्या दुकानात दुपारी सिलेंडर चा स्फोट झाल्याने भीषण आग लागली त्या आगीत दुकान मालका सह सात जण जखमी झाले असुन या जखमीना शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारा करिता दाखल केले आहे तर आगीवर अग्निशमन दलाच्या जवानी नियंत्रण मिळवले आहे .

उल्हासनगर कॅंप न . ४ येथील भारत डेअरी जवळ जय माता दि नावाचे वडापाव चे दुकान आहे. या दुकानात दुपारी एक वाजता सिलेंडर चा स्फोट झाला हा स्फोट इतका भयंकर होता की त्या दुकानाला भयंकर आग लागली . तेव्हा शेजाऱ्यानी महापालिकेतील अग्निशमन दलाला कळविले असता अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होवुन त्यानी आगीवर नियंत्रण मिळवले . दरम्यान या आगीत आठ जण जखमी झाले असुन तीन गंभिर स्वरुपाचे भाजले असुन पाच किरकोळ भाजले आहेत. पप्पु गुप्ता ,दिनेश गुप्ता ,लक्ष्मण दुलारी ,मनोज जैसवाल , आशिष राजकुमार प्रजापती  आणि मंगलुर अशी जखमीची नावे असुन या सर्व जखमीना मध्यवर्ती रुग्णालयात उपचारा करिता दाखल केले आहे . दरम्यान या आगी मुळे दुकान मालकाचे आर्थिक नुकसान झाले असुन मात्र आगीचे कारण स्पस्ट झाले नसुन फक्त सिलेंडर चा स्फोट च कारणीभुत आहे की शॉर्ट सर्किट मुळे आग लागली याचा तपास विठ्ठलवाडी पोलिस हे करत आहेत .

संबंधित पोस्ट