
उल्हासनगर शहराचा स्थापना दिवस ८ ऑगस्ट रोजी. उल्हासनगरचा इतिहास व संक्षिप्त माहिती.
- by Rameshwar Gawai
- Aug 07, 2020
- 427 views
उल्हासनगर (रामेश्वर गवई) : द्वितीय महायुद्ध (१९४५) च्या दरम्यान ब्रिटिश सरकारने कल्याणच्या बाजूला असलेल्या १३ स्क्वेअर किलोमीटर च्या निर्जन ठिकाणी कल्याण मिलिटरी ट्रान्झिट कॅम्प ची स्थापना केली.
कल्याण कॅम्प मध्ये सैनिकांची राहण्याची सोय होती. इथून सैनिकांना आसाम च्या युद्ध भूमीवर पाठविले जात होते . तर
कल्याण कॅंप हे एक, दोन, तीन, चार व पाच कॅंप मध्ये विभागन्यात आले होते. तसेच, ए, बी आणि सी असे तीन प्रकारचे ब्लॉक आणि चाळी सदृश्य बॅरेक हे सैनिक व अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने ही होती.
ओ . टी . सेक्शन अर्थातच ऑफिसर्स टेनामेंट हे पाचही कॅम्प मध्ये निर्माण केले गेले .
सैनिकांसाठी GEM's siding (आताच विठ्ठलवाडी) हे एकमेव स्टेशन होतं. Garrison Engineering (G.E.M.) इथे सैनिकांसाठी रसद पुरवठा होत असे.
द्वितीय महायुद्ध संपल्यावर कल्याण कॅंप देखील निर्मनुष्य झाले होते . तर अखंड भारताची फाडणी झाल्यावर, पाकिस्तान मधील निर्वासित भारतात आसरा घेऊ लागले. भारतात कल्याण कॅंप हे अशा निर्वासितांना राहण्याच्या ठिकाणांपैकी एक होत.
निर्वासित सिंधी लोकांची भारतातील सर्वात मोठी वस्ती उल्हासनगर मध्ये निर्माण झाली होती,
कराचीतील निर्वासित कोकणस्थ मराठी बांधव हे मराठा सेक्शन इथे वसले तर सिंध मधील निर्वासित गुजराती तसेच गोमंतक समाज देखील उल्हासनगर मध्ये स्थायिक झालेत .
भारताचे प्रथम व शेवटचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांच्या हस्ते ८ ऑगस्ट १९४९ रोजी उल्हासनगर टाउनशिप ची कोनशिला बसविण्यात आली. ही कोनशिला महापालिका कार्यालया मागील स्विमिंग पुल जवळ आता ही आहे.
माजी बँक मॅनेजर रघुनाथ विश्राम राणे हे चीफ ट्रान्झिट कमांडर म्हणून उल्हासनगर ची प्रशासकीय देखरेख करीत होते .
अंबरनाथ व विठ्ठलवाडी दरम्यान रेल प्रवासी एका विशिष्ठ ठिकाणी चेन खेचून लोकल थांबवायचे. त्याच ठिकाणी १९५६ रोजी उल्हासनगर रेल्वे स्टेशन हे अस्तित्वात आले .
उल्हासनगर ला तीन स्टेशन आहेत - उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि शहाड तर
या शहरात पाच पिनकोड आणि पाच पोस्ट ऑफिस आहेत - ४२१००१, ४२१००२, ४२१००३, ४२१००४ आणि ४२१००५
इथे चार पोलिस स्टेशन, एक शहर वाहतूक पोलिस स्टेशन. सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालय आणि पोलिस उपायुक्त कार्यालय आहे.त्याच प्रमाणे उल्हासनगर शहरात उपविभागिय अधिकारी कार्यालय , तहसीलदार, तलाठी,भुमी अभिलेख कार्यालय . महापालिका आणि कोर्ट आणि दोन शासकिय रुग्णालये हे देखील आहेत .
येथील जीन्स व फर्निचर मार्केट सोबतच मोबाईल मार्केट हे देशातील मोठ्या मार्केट पैकी आहेत. नव्वदच्या दशकात दुबईतील ९०% एम्ब्रोईडरी ही उल्हासनगर मध्ये केली जात असे.
शहरात नऊ सिनेमागृह आहेत - प्रभात (बंद), विनस, अनिल, अशोक, पॅरामाऊंट, जवाहर, सपना, अमन आणि श्रीराम हे सिनेमागृह असुन
उल्हासनगर कॅंप क्रमांक एक इथे बिर्ला कंपनीने बांधलेले भव्य बिर्ला मंदिर आहे तर त्या मंदिराच्या समोरच सेंच्युरी कंपनी असुन त्या कंपनीत उल्हासनगरचे हजारो कामगार काम करतात . त्याच प्रमाणे बिर्ला मंदिराच्या बाहेरील परिसरात _तेरे नाम_ या सिनेमाचं चित्रीकरण झाले आहे.उल्हासनगर हे ३ विधानसभा क्षेत्रात विभागले गेले आहे त्यामुळे या शहराला तीन आमदार लाभले आहेत .
शिवसेनेचे प्रसिद्धबोध चिन्ह असलेला वाघ, या शहरातील बाबा गुर्जर यांनीच रेखाटला होता .
भारतातील सर्वात श्रीमंत दलित महिला पद्मश्री कल्पना सरोज ह्या उल्हासनगरच्याच रहिवासी आहेत
देशातील टॉप टेन photojournalist पैकी एक असलेले पद्मश्री सुधारक ओलवे हे देखील उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात राहत होते .
शहरातील डॉ. दयाल आशा हे सिंधी साहित्यातील पहिले D.Lit पदवीचे मानकरी आहेत.
महाराष्ट्रातील सर्वात वरिष्ठ व देशातील प्रमुख दहा बौद्ध भिख्खू पैकी असलेले (श्रीलंकन) आनंद महाथेरो भंते हे पन्नास वर्षांपासून उल्हासनगरातील सुभाष टेकडी येथे राहत असुन त्यानी तक्षशिला विद्यालय सुध्दा स्थापन केले आहे .
शहरातील अंध असलेल्या प्रांजल पाटील, IAS अधिकारी म्हणुन शासकीय सेवेत कार्यरत आहेत.
उल्हासनगर हे राज्यातील शंभर टक्के शहरीकरण झालेल्या चार शहरांपैकी एक आहे. मुंबई, पुणे व ठाणे हे इतर तीन शहरा पाठोपाठ या शहराचे विस्तारीकरण होत आहे . दरम्यान ८ आगस्ट हा उल्हासनगर चा स्थापना दिवस आहे . या स्थापना दिना च्या निमित्ताने माजी नगरसेवक आणि ज्येष्ट पत्रकार . विचारवंत साहित्यिक लेखक श्री दिलीप मालवणकर यानी ही माहीती दिली आहे . त्यानी शहरवासीयाना स्थापना दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देवुन कोरोनाला हरविन्या करिता बाहेर फिरु नका घरातच रहा असा संदेश ही दिला आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम