सत्यसाई प्लँटिनियम सारख्या लुटारू रूग्णालयांची सरकारनं मान्यता रद्द करावी .

प्रा. कवाडे यांचा तीव्र आंदोलनाचा ईशारा .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : सरकारच्या मदतीशिवाय आणि विरोधकांच्या उचापतींंना तोंड देत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार  कोरोनाची लढाई यशस्वीपणे लढत आहे .परंतु उल्हासनगरच्या दौऱ्यांंतर्गत येथील प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे खाजगी डॉक्टरांनी रुग्णांच्या जीवांशी खेळण्याचे अनेक तक्रारी समोर येत आहेत. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अशा लुटारू रुग्णालयांंची मान्यता रद्द करण्याची मागणी करणार आहे.अशी प्रतिक्रीया  पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा . जोगेंद्र कवाडे यानी दिली आहे ते  एका कार्यक्रमा करिता उल्हासनगर येथे आले होते .
 
सत्यसाई प्लँटिनियम सारखी अनेक खाजगी रुग्णालयात  महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजने अंतर्गत रुग्णांची सतावणुक करणे, उपचार नाकारणे, भरमसाठ बिलं आकारणे, वैद्यकीय निष्काळजीपणा करणे, यासारखे अक्षम्य प्रकार निदर्शनास येत आहेत. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून सत्य साई कोविड  प्लॅटिनम व ईतर खासगी लुटारू रुग्णालयांची चौकशी करावी, रुग्णांना दिलेल्या बिलांचं त्रयस्थ पक्षिय लेखापरीक्षण करुन  उर्वरित बिलं गरीब रुग्णांना परत करावीत, व त्यांची मान्यता रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती कवाडे यांनी बोलतांना दिली  आहे . 
                  
येथील खासगी रुग्णालयं प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे रुग्णांना मोफत उपचार, व्हेंटिलेटर ऑक्सिजन अभावामुळे मृत्यू दर वाढल्याने खाजगी रुग्णालयाचे  फावले आहे. मॅक्सलाईफ सारख्या रुग्णालयाच्या  लेखापरीक्षणांअंती  ८२  पेक्षा अधिक अनियमित बिलांमध्ये ३६  लाख रुपयांपेक्षा जास्त तफावत आढळणे ही प्रशासनाच्या ढिलेपणाचे उदाहरण आहे. 
                 
याबाबत मी अशा वादग्रस्त रुग्णालयांंच्या बिलांची थर्ड पार्टी आँडिट करण्याची मागणी सरकारकडे करीत आहे. स्थानिक प्रशासनाने अशा लुटारू डॉक्टरांवर लगाम न घातल्यास पीपल्स रिपब्लिकन पार्टी तीव्र आंदोलन छेडले असा इशारा पी आर पी चे  पक्षाध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिला आहे.

संबंधित पोस्ट