
उल्हासनगर अंबरनाथ व बदलापुर येथे मुसळधार पावसाने जन जीवन अस्तव्यस्त .
- by Rameshwar Gawai
- Aug 06, 2020
- 793 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : गेल्या तीन दिवसा पासुन पडत असलेल्या मुसळधार पावसाने उल्हासनगर अंबरनाथ व बदलापुर या तीन ही शहरातील जन जीवन अस्तव्यस्त झाले असुन काही ठिकाणी तुफान वाऱ्याने झाडे उन्मळुन पडली आहेत तर उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे नागरिक भयभित झाले आहेत .पुराचे पाणी शहरात न शिरल्याने कोणते ही नुकसान अथवा हानी झाली नाही .
गेल्या तीन दिवसा पासुन तुफान वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे . तर वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे देखिल पडली आहेत . कर्जत कडुन वाहत येणारी उल्हासनदी दुथडी भरुन वाहत आहे . तर नदी काठावरील उल्हासनगर अंबरनाथ व बदलापुर या तीन ही शहरातील नागरिकाना सावध राहन्याच्या सुचना प्रशासनाने केल्या आहेत . दरम्यान उल्हासनदी दुथडी भरुन वाहत असल्याने डॅम रोड वरील पुलाच्या कठड्याला पाणी लागले आहे . दरम्यान या विभागाचे आमदार किसन कथोरे यानी बेडशील . चिकन्याची वाडी . चिंचवली व भोज या वाड्याना भेट देवुन येथे झालेल्या मुसळधार पावसाने व जोराच्या वाऱ्याने घरांची पडझड झाली असुन या घरांची पाहणी आमदार कथोरे यानी केली आहे . या वेळी त्यांच्या सोबत अंबरनाथ चे तहसीलदार जयराज देशमुख विद्युत विभागाचे अधिकारी राऊत हे होते तर तहसीलदार देशमुख याना या पडलेल्या घरांचे ताबडतोब पंचनामे करन्याचे आदेश ही आमदार कथोरे यानी दिले आहेत . अंबरनाथ व उल्हासनगर येथे मात्र अद्याप तरी कोणते ही नुकसान झाले नाही
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम