उल्हासनगर येथील प्लॅटिनम कोविड हॉस्पिटलने बंद केलेली महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु करा . नगरसेविका तोरणे यांची मागणी .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर महापालिकेच्या प्रयत्नाने बनलेले प्लॅटिनम कोविड हॉस्पिटलचे संचालक डॉ . संजित पॉल यानी आपले दात दाखवायला सुरवात केली असुन शासनाने लागु केलेली महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद केल्याचे फलक या रुग्णालयाच्या बाहेर लावल्याने गोर गरीब लोक कुठे उपचार घेणार . तेव्हा ही योजना ताबडतोब सुरु करन्याची मांगणी नगरसेविका सौ सविता तोरणे व समाजसेवक शिवाजी रगडे यानी आयुक्त डॉ . राजा दयानिधी याना दिलेल्या निवेदनात केली आहे .

उल्हासनगर येथील कॅंप ३ मध्ये प्लॅटिनम कोविड हॉस्पिटल हे महापालिकेच्या प्रयत्नाने सुरु झालेले आहे . सुरवातीला मोठा गाजावाजा करुन हे हॉस्पिटल गोर गरीबा करिता असुन या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजनेतुन मोफत उपचार होणार असे महापालिकेने सांगितले होते. परंतु या रुग्णालयाचे संचालक डॉ . संजित पॉल यानी महापालिकेचे आदेश न जुमानता महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद करुन टाकली आहे . तेव्हा नगरसेविका सौ सविता तोरणे व शिवाजी रगडे यानी या योजने चे आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांच्या शी या योजने बाबत बोलणे केले असुन सदर योजना ही प्लॅटिनम ला लागु आहे . परंतु प्लॅटिनम हॉस्पिटल ने सदर योजना बंद केल्याने आयुक्ताना निवेदन देवुन नगरसेविका तोरणे व रगडे यानी ती योजना सुरु केरन्याची मांगणी केली आहे 

संबंधित पोस्ट