युनिकॉन सिक्युरिटी अँड अँलाईड सर्विसेसचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : कोरोनाकाळात पोलिसां प्रमाणेच खाजगी सुरक्षारक्षकांनी ही आपली भूमिका चोखपणे निभावली आहे. येत्या काळात या खासगी सुरक्षा रक्षकांवर आता नागरिकांच्या केवळ घर आणि मालमत्ताच नव्हे तर त्यांच्या आरोग्याच्या रक्षणाच्या दृष्टीने ही दक्ष राहण्याची जबाबदारी येऊन ठेपली आहे . यासाठी आम्ही आमच्या संस्थेतील प्रशिक्षित सुरक्षारक्षकांना आता अद्ययावत प्रशिक्षणही दिलं आहे. आमचा प्रामाणिकपणा व शिस्तबद्धता यामुळे हा पाच वर्षांचा यशस्वी प्रवास इथवर येऊन ठेपला आहे. अशी माहिती संस्थाध्यक्ष गणेश तिखंडे यांनी दिली आहे.
       
यावेळी उपस्थित उल्हासनगर सहाय्यक पोलीस आयुक्त डि डि टेळे यांनीही संस्थेचा पारदर्शकतेचा गौरव केला . तर माजी नगरसेवक व राष्ट्रवादी नेते प्रकाश तरे यांनी या संस्थेचा आढावा घेवुन  कौतुकास्पद शुभेच्छा दिल्या. यावेळी शाखाप्रमुख जगदीश तरे, मराठी एकिकरण समिती कल्याण शहर उपाध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, रितेश वंजारी, दत्ताराम लाड  तसेच युनिकॉन सिक्युरिटी अँड अँलाईड  सर्विसेसचे पदाधिकारी
 उपस्थित होते.

संबंधित पोस्ट