
तर कोल्हापूरवर महापुराचे सावट!कोल्हापुरात मुसळधार पाऊस एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना
कोरोना व पूर दोन्ही संकटे एकाचवेळी
- by Adarsh Maharashtra
- Aug 06, 2020
- 1959 views
कोल्हापूर : जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलंडण्यास सुरुवात केली आहे. धोक्याची पातळी गाठण्यासाठी पंचगंगेला केवळ दोन फूट बाकी आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ४१ फूट २ इंचावर आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून कोल्हापूर जिल्ह्यातील १०२ बंधारे पाण्याखाली आहेत. तर राधानगरी धरणाचे स्वयंचलीत दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापुरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना करण्यात आल्या आहेत.
परिसरात दिवसभरात सूरु असलेल्या जोरदार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती पुनर्वसन दलाच्या दोन तुकड्या कोल्हापूरसाठी रवाना करण्यात आल्या आहेत,अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
कोल्हापूरमधील पावसाची स्थिती लक्षात घेऊन राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या समवेत बैठक घेतली यावेळी एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापूरला पाठविण्या बाबत मागणी केली.मुख्यमंत्र्यांनी देखील कोल्हापूरसाठी तत्काळ तुकड्या रवाना करण्याचे निर्देश दिल्याचे राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील नदी काठच्या गावातील लोकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आवाहनानंतर ग्रामस्थांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. चिखली गावातील ग्रामस्थांनी प्रत्यक्षात स्थलांतराला सुरुवात केली आहे. दौलत देसाई यांनी चिखली गावात पोहोचून ग्रामस्थांना स्थलांतर करण्याची विनंती होती. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये दवंडी पिटून नदीकाठच्या ग्रामस्थांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूरात सरासरी १५० मिली तुफानी कोसळणारा पाऊस, धरण -नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झालेली वाढ , पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे होऊ लागलेली वाटचाल यामुळे कोल्हापूर जिल्ह्यावर यंदा महापूराचे संकट घोंघावताना दिसत आहे.एकीकडे करोनाचा वाढता संसर्ग रोखण्याचे आव्हान बिकट बनले असतानाच त्यात आता मोजक्या यंत्रणेनिशी महापूर संकटाचा मुकाबला करावा लागणार असल्याने या दोन्ही आव्हानांना सामोरे जाताना प्रशासनाचा कस लागणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला मागीलवर्षी ऑगस्टमध्ये महापुराचा जबर तडाखा बसून मोठी हानी झाली होती. या संकटातून जिल्हा सावरत असतानाच मार्च महिन्यापासून जिल्ह्यात करोनाचे रुग्ण आढळू लागले. प्रत्येक महिन्याला यामध्ये झपाट्याने वाढ होत गेली.त्यात आता जिल्ह्यात करोना रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नसल्याने सर्वपक्षीय कृती समितीला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले आहे एकीकडे करोनाचे संकट गंभीर बनत चालेले असताना आता महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात जून मध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली . मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने तरारून आलेली पिकं हातची जाण्याची शक्यता निर्माण झाली होती . अशा मोक्याच्या वेळी पावसाचे दमदार पुनरागमन शेतकऱ्यांना सुखावणारे असले तरी प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.पावसाची गती पाहता पंचगंगा नदी आज रात्री इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे जाण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर गावा गावात दवंडी देऊन नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला जात आहे.ही गंभीर परिस्थिती ओळखून जिल्हा प्रशासन दक्ष झाले आहे. प्रत्येक गावात तलाठी , ग्रामसेवकासह सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
महापुराचा अधिक धोका असलेल्या करवीर तालुक्यातील चिखली व आंबेगाव येथील गावकऱ्यांना स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आ हेत. महापुराचा धोका निर्माण निर्माण झाल्यास बचावासाठी एनडीआरएफची पथके अगोदरच तैनात झाली आहेत. महापुरातील लोकांना बाहेर काढण्यासाठी लाईफ जॅकेटचा वापर करण्याची सज्जता ठेवली आहे. एकंदरीत प्रशासनाने महापुराला सामोरे जाण्याची तयारी केली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम