उल्हासनगर येथिल वादग्रस्त कोविड प्लॅटिनम हॉस्पिटल ला महिन्याला दिड कोटी रुपये देण्याचा महापालिकेचा प्रयत्न- मनविसेचा आरोप .
- by Rameshwar Gawai
- Aug 05, 2020
- 1357 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात कोरोना महामारीच्या प्रादुर्भावात नागरिकाना चांगले व वेळेवर उपचार मिळावे म्हणुन महापालिकेच्या मदतीने कोविड प्लॅटिनम हे खाजगी हॉस्पिटल तयार झाले परंतु या हॉस्पिटलचे उद्घाटन झाल्या पासुनच ते चर्चेत राहिले आहे . तर या हॉस्पिटल शी महापालिकेचा कोणता ही संबध नसल्याचा खुलासाही महापौर यांचे चिरंजीव अरुण आशाण यानी पत्रकारा समोर जाहीर केला होता.परंतु आता तर या सत्ताधाऱ्यानी नवीनच शकल लढवुन या रुग्णालयाला दर महिन्याला दिड कोटी रुपये देवुन त्या बदल्यात ३० आय सी यु बेड व ७० ऑक्सिजन बेड महापालिकेच्या ताब्यात घ्यायचे अशी योजना तयार केल्याचे समजताच याला मनविसे चे शहर अध्यक्ष मनोज शेलार यानी विरोध केला असुन आयुक्त डॉ राजा दयानिधी याना निवेदन देवुन त्या रुग्णालयाला महिन्याला दिड कोटी रुपये देवु नये. अन्यथा आम्ही आंदोलन करु असा इशारा ही शेलार यानी दिला आहे
उल्हासनगर कॅंप ३ येथिल रिजंसी प्लाझा या इमारतीत महापालिकेच्या मदतीने फिजियो थिरपी ही डीग्री असलेल्या डॉ संजित पॉल यानी कोविड प्लॅटिनम हॉस्पिटल सुरु केले आहे सुरवातील हे हॉस्पिटल गोर गरीब कोरोना बाधित रुग्णांवर उपचार होणार असे जाहीर करन्यात आले होते . परंतु नंतर या हॉस्पिटल शी महापालिकेचा कोणता ही संबध नसल्याचे नगरसेवक अरुन आशाण यानी जाहीर केले दरम्यान सध्या कोविड प्लॅटिनम हॉस्पिटल हे पुर्णता खाजगी असुन या रुग्णालयात रुग्णांची लयलुट सुरु केली आहे . त्यातच या रुग्णालयातील ३० आय सी यु बेड आणि ७० ऑक्सिजन बेड ताब्यात घेवुन त्या बदल्यात या रुग्णालयाला दर महिन्याला दिड कोटी रुपये द्यायचे असा नवीन प्लान येथिल सत्ताधाऱ्यानी आखला असल्याची कुणकुण मनविसेचे शहर अध्यक्ष मनोज शेलार याना लागताच त्यानी आयुक्त डॉ राजा दयानिधी याना निवेदन देवुन विरोध दर्शवला आहे . तर त्यानी निवेदनात म्हटले आहे की सत्ताधारी व डॉ . संजित पॉल यानी संगनमत करुन त्या हॉस्पिटल मध्ये सुरु असलेली महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद करुन गोर गरिब नागरिकाना वेठीस धरण्याचे काम सुरु केल्याचा आरोप मनोज शेलार यानी केला आहे . या रुग्णालयाला दर महिना दिड कोटी रुपये दिल्या पेक्षा कोविड रुग्णालय उल्हासनगर ४ आय टी आय कोविड केयर सेंटर या ठिकाणी खर्च करुन त्या रुग्णालयात अध्यावत सुविधा देवुन तेथे व्हेंटिलेटर आय सी यु बेड जास्तीत जास्त तयार करुन अधिक बेड ची क्षमता वाढवा असे ही निवेदनात म्हटले आहे . जर का या प्लॅटिनम हॉस्पिटल ला महिन्या पोटी दिड कोटी रुपये दिले तर मनविसे च्या वतीने आंदोलन करन्यात येइल असा इशारा ही मनोज शेलार यानी दिला आहे.दरम्यान या बाबत महापौर यांचे चिरंजीव अरुन आशाण यांच्या शी संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवु शकला नाही.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम