उल्हासनगर येथिल मॅक्स लाईफ रुग्णालयाने बेकायदा वसुल केले रुग्णांकडुन ३६ लाख ३९ हजार रुपये,महापालिकेने बजावली नोटीस,नगरसेविका तोरणे यांनी केली होती तक्रार.

उल्हासनगर/प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ३ येथिल मॅक्स लाईफ या रुग्णालयाने एका कोविड रुग्णाला  अधिक बिलाची आकारणी करुन त्या रुग्णाला बिल न भरल्या मुळे दोन दिवस डाबुन ठेवले होते . तेव्हा समाजसेवक शिवाजी रगडे यानी त्या रुग्णालयाला दणका देताच त्या रुग्णाचे  बिल माफ करुन सुटका करन्यात आली.  दरम्यान या रुग्णालयाची तपासणी करुन बेकायदा बिल आकारणी करतात तेव्हा यांचे लेखा परिक्षण करुन कारवाई करन्याची मांगणी नगरसेविका सविता तोरणे.रगडे यानी महापालिका आयुक्त डॉ  राजा दयानिधी यांच्या कडे केली होती . तेव्हा आयुक्तानी महापालिकेचे एक पथक तयार करुन मॅक्स लाईफ रुग्णालयाचे लेखा परिक्षण केले असता या रुग्णालयाने आता पर्यंत ८२ रुग्णांकडुन ३६ लाख ३९ हजार ९६५ रुपये इतकी बेकायदेशीर बिल  वसुल  केल्याचे उघड झाल्याने महापालिका आयुक डॉ . दयानिधी यानी त्या रुग्णालयाला नोटीस पाठवली  असल्याची माहीती महापालिकेचे जन संपर्क अधिकारी युवराज भदाणे यानी दिली आहे . 

उल्हासनगर कॅंप ३ येथे मॅक्स लाईफ हे खाजगी रुग्णालय आहे या रुग्णालयात कोविड रुग्णावर उपचार होतात . तेव्हा महापालिकेने साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ नुसार १३ मार्च २०२० पासुन आपत्ती व्यवस्थापन कायदा लागु केला . दरम्यान शहरातील खाजगी रुग्णालयानी शासकिय दरा पेक्षा बिल आकारणी करतात असे आढळुन आल्याने महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी यांच्या अधिसुचने नुसार सहाय्यक मुख्य लेखा परिक्षक अशोक मोरे . लिपीक पुजा पतंगे यांचे एक पथक तयार केले . तर या पुर्वी समाजसेवक शिवाजी रगडे व नगरसेविका सौ सविता तोरणे यानी मॅक्स लाईफ रुग्णालय हे कोविड रुग्णांकडुन बेकायदेशीर बिल वसुल करतात ही तक्रार आयुक्ताना दिली होती तेव्हा याच तक्रारीच्या अनुषगाने महापालिकेच्या पथकाने मॅक्स लाईफ न्युरोकेयर व रिचर्स सेंटर या रुग्णालयाची तपासणी केली असुन सदर रुग्णालयाने उपलब्ध करुन दिलेल्या बिलाचे लेखा परिक्षण केले आहे . तर कोरोना २०२० / सी आर / ९७ / ए आर ओ जे . पी एच डी मुंबई यांच्या तरतुदीनुसार रुग्णांकडुन बिल आकारणी आवश्यक असताना सदर चे रुग्णालय हे  एकुण ८२ रुग्णांची प्रकरणे नियमबाह्य ३६ लाख ३९ हजार ९६५ रुपये अशी जादा बिलाची आकारणी केल्याचे दिसुन आले आहे . तर सदर वसुल केलेली रक्कम ही संबधित  त्या रुग्णालया कडुन पुन्हा वसुल करन्या साठी मॅक्स लाईफ या रुग्णालयाला महापालिका आयुक्त डॉ  राजा दयानिधी यानी नोटीस दिली आहे  तर अन्य खाजगी रुग्णालयांचे देखिल लेखा परिक्षण करन्याचे काम सुरु असल्याची माहीती जन संपर्क अधिकारी युवराज भदाणे यानी दिली आहे .

संबंधित पोस्ट