गणपती करिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या तोंडाला सरकारने पुसली पाने . कोकण प्रवाशी संघटनेचा आरोप .
- by Rameshwar Gawai
- Aug 04, 2020
- 1433 views
उल्हासनगर / प्रतिनिधी : दर वर्षी गौरी गणपतीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्या करिता एस टी महामंडळ विठ्ठलवाडी डेपोतुन जवळ पास २५०० बसेस सोडत असते . तर रेल्वे प्रशासन सुध्दा १० गाड्या सोडुन या चाकरमान्यांची सोय करत असे परंतु या वर्षी कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाने शासनाने कोकणात जाण्या करिता चाकरमान्या साठी कोणती ही सोय केली नसुन या ठाकरे सरकार ने त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत असा आरोप कोकण प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शिर्के ( काका ) यानी केला आहे .
आता काही दिवसानीच गणेशोत्सव येणार आहे.तेव्हा मुंबई व आजु बाजुच्या उपनगरात कोकणातील लोक राहतात ते दरवर्षी गौरी गणपतीच्या उत्सवाला कोकणात आपल्या परिवारासह जातात तेव्हा त्याना जाण्या करिता एस टी महामंडळ व रेल्वे प्रशासन त्यांची सोय करते . तर विठ्ठलवाडी डेपोतुन दर वर्षी २५०० बसेस सोडन्यात येतात . त्याच प्रमाणे १० रेल्वे गाड्या ही सोडतात . परंतु या वर्षी कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाने कोकणातील चाकरमान्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत .असा आरोप कोकण प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शिर्के यानी केला आहे.कोकणात जाण्या करिता आता पर्यंत शासनाने कोणते ही नियोजन केले नाही दरम्यान उत्तर प्रदेश मध्यप्रदेश ,झारखंड बिहार . पश्चिम बंगाल ओरिसा येथिल पर प्रांतियाना शासनाने त्यांच्या राज्यात सुखरुप नेवुन सोडले तर त्यांच्या करिता रेल्वे ने गाड्या सुध्दा सुरु ठेवल्या आहेत.त्यामुळे तेच पर प्रांतिय पुन्हा मुंबईत येत आहेत. मात्र महाराष्ट्रातील माणुस हा जिल्ह्याच्या बाहेर जावु शकत नाही तर त्यांच्या करिता रेल्वेने आता पर्यंत एक ही ट्रेन सोडली नाही. दरम्यान मुंबई मध्ये सुध्दा लोकल सुरु केल्या आहेत परंतु त्या ही अत्यावश्यक सेवे करिताच पण रुग्णाना मुंबई येथिल हॉस्पिटल मध्ये लोकल ने जाता येत नाही ही किती मोठे या शासनाचे अपयश आहे .जर कोकणात जाण्या करिता शासनाने कोणत्या ही उपाय योजना केल्या नाही तर कोकण प्रवाशी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा मुरलीधर शिर्के यानी दिला आहे सरकारने पुसली पाने,कोकण प्रवाशी संघटनेचा आरोप .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम