उल्हासनगर महापालिके कडुन कोविड रुग्णालयातील वेस्टेड कचरा मुंबई येथे पाठविन्यात येतो . मुख्य आरोग्य निरीक्षक विनोद केणे .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर येथिल कोविड रुग्णालये आणि भिवंडी येथिल आमंत्रा या क्वारंटाईन सेंटर मधील  पीपीई किट, गाउन, टोपी, शू-कवर, एन९५ मास्क आणि  ग्लोज  इत्यादि   कोविड साहित्य हे वापरा नंतर  वेस्टेड झालेले साहित्य यांची विल्हेवाट लावन्याचे काम मुंबई येथिल  एसएमएस वेस्ट मॅनेजमेंट एजंसी ला देन्यात येत असल्याची माहीती महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक विनोद केणे यानी दिली आहे.

उल्हासनगर शहरात कोरोना चा कहर सुरु झाल्याने रुग्णांवर उपचार व्हावे म्हणुन कोविड रुग्णालये महापालिकेने तयार केले आहेत . तर संशयीतांचे स्वॅब घेवुन त्याना क्वारंटाईन करन्या करिता भिवंडी बायपास येथे टाटा आमंत्रा येथे क्वारंटाईन सेंटर सुरु केले आहे . दरम्यान उल्हासनगर येथिल कोविड रुग्णालये व क्वारंटाईन सेंटर येथे वापरात येत असलेले पी पी ई किट . गाऊन . टोपी . शुकवर . एन ९५ मास्क आणि ग्लोज यांचा वापर झाल्यावर या साहित्याची विल्हेवाट लावन्याचे काम महापालिकेने मुंबई येथिल एस एम एस वेस्ट मॅनेजमेंट या एजंसीला काम दिले आहे . तर ही  एजंसी या वेस्टेड साहित्याची उचलन करुन त्यांची विल्हेवाट लावन्याचे काम करते . तर या करिता ४ मोठ्या गाड्या आणि काही घंटा गाड्या यांचा वापर करन्यात येतो . तर काही  बाकी असलेले जेवनाचे वेस्टेड साहित्य हे डब्बे व थैल्या मध्ये भरन्या पुर्वी त्यांचे सॅनिटायझरेशन करुन ते अलग अलग करुन त्याना खड्ड्यात दाबुन देन्यात येते .

सोबतच आयुक्ताच्या आदेशा नुसार शहरातील सार्वजनिक शौचालये दिवसातुन सहा वेळा जंतु नाशक फवारणी करुन स्वच्छ करन्यात येतात .तर कोरोनाला हरविन्या करिता महापालिका युध्द पातळीवर प्रयत्न करत असल्याची ही माहिती केणे यानी दिली आहे .

संबंधित पोस्ट