कोरोना महामारीच्या लाभात २० कोटीची निविदा मंजुर करुन ठेकेदार हात धुवून घेन्याच्या तयारीत .

उल्हासनगर (प्रतिनिधी) : देशात राज्यात सध्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव जोरात सुरु आहे तेव्हा  उल्हासनगर शहर सुध्दा  कोरोनाग्रस्त असताना व या संकटाशी महापालिका व सर्व यंत्रणा  झुंज देत असताना उल्हासनगरच्या सेटींगबाज ठेकेदारांनी २० कोटीची निविदा पदरात पाडून घेण्यासाठी चांगलीच फिल्डिंग लावली असुन कोरोनाच्या वाहत्या गंगेत हे ठेकेदार हात धुवून घेन्याच्या तयारीत दिसत आहेत  

उल्हासनगर कॅंप ४ येथिल व्हि टी सी  मैदानाचे नामकरण कै.बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल असे करन्यात आले असुन या क्रीडा संकुलाचा विकास करन्या साठी   महाराष्ट्र शासनाकडून तीन वर्षापुर्वी निधी मंजूर करुन पाठविन्यात  आला होता. तेव्हा हा निधी वापराविना तसाच पडून असल्याने तो निधी परत करण्यात यावा,असे शासनाचे निर्देश येताच येथिल सेटिंग बाज ठेकेदार मंडळी जागी झाली आहे दरम्यान शासनाचा प्लॅस  निधी १० कोटी व महापालिकेचे दहा कोटी अशी २० कोटीची निविदा सदर क्रीडा संकुलाच्या विकासा बाबत काढन्यात आली आहे. तर ही  निविदा मंजूर करण्यासाठी आयुक्त डॉ . राजा दयानिधी याना  राजी करण्यासाठी ही ठेकेदार लाॅबी व त्यांचे राजकीय गाॅडफादर कोरोना परिस्थितीचा लाभ घेऊन दिवस रात्र एक करुन या कोरोनाच्या गंगेत हाथ धुवून घेन्याची संधी शोधत आहेत .

दरम्यान  हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किमान ५०  कोटीचा खर्च अपेक्षित असुन  महापालिका तर सध्या  दिवाळखोरीत आहे  तर या  कोरोनामुळे महसुल वसुली ठप्प असताना अशी निविदा मंजूर करणे कितपत योग्य आहे.मात्र  इतके करूनही हा प्रकल्प पूर्ण होणार नाही . कारण  ठेकेदारांनी आयुक्तांपासून शिपायापर्यंतच्या टक्केवारीचे गणित मांडून ठेवले आहे.  सदर निधी वापरण्याची मुदत संपुष्टात आली असताना, तो शासनास परत करण्याऐवजी त्याची विल्हेवाट लावण्याचे मनसुबे सध्या तरी  रचले जात आहेत. त्यासाठी सुट्टीच्या दिवशीही ठेकेदार व त्यांच्या राजकीय गाॅडफादर्सचा महापालिकेत वावर असतो.

सदर निविदा मंजूर करून शासनाच्या निधीचा अपहार करण्याची संधी द्यायची की कोरोनामुळे आर्थिक स्थिती डबघाईस आलेल्या महाराष्ट्र राज्य शासनास तो निधी प्रामाणिकपणे परत करायचा याचा निर्णय कर्तव्यदक्ष आयुक्त डाॅ. राजा दयानिधी यांना घ्यावा लागेल असे वाटते .

संबंधित पोस्ट