उल्हासनगरातील सत्यसाई कोविड प्लॅटिनम हॉस्पिटलचा संसर्गजन्य जैविक कचरा उघड्यावर .

उल्हासनगर / प्रतिनिधी :  सत्यसाई प्लॅटिनम रुग्णालय कोरोना संक्रमणात अनेक वादांच्या जंजाळात अडकलंय. आता पुन्हा आपल्या जैविक वैद्यकीय कचऱ्याच्या  

निष्काळजी व्यवस्थापनामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. शहरातील एकमेव खाजगी कोविड रुग्णालय असणाऱ्या या रुग्णालया कडून आपला जैविक संसर्गजन्य वैद्यकीय  कचरा हा रुग्णालया च्या आवारात अस्ताव्यस्त उघड्यावर टाकला जातोय.तर कधी हा  कचरा जवळच्या नदीत फेकून दिला जातोय. या कचऱ्या  मुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सत्यसाई प्लँटिनमच्या डॉ.संजित  पाँलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे यांनी केली आहे.

वास्तविक, प्रत्येक खाटेमागे जमा होणाऱ्या जैविक कचऱ्या पैकी  संसर्गजन्य साहित्याचे प्रमाण साधारण १५ ते २० टक्के असते .परंतु या कोरोना संसर्ग काळात रूग्णांवर उपचारार्थ वापरलेले पिपीई किट, इंजेक्शन सिरीज , ग्लोज , मास्क, ग्लुकोजच्या बाटल्या, सुया, तिक्ष्ण साहित्य, रक्ताने  माखलेले बँडेज, प्लँस्टिक, काचेच्या वस्तू हा सर्व जैविक कचरा ८० ते ९० टक्के संसर्गजन्य आहे. हा कचरा प्रवेशद्वारापासून काही अंतरावरच उघड्यावर व कुंडीतून ओसंडून वाहत आहे. 

तर बहुतांशी रुग्णालयाच्या आवारातच हा कचरा अस्ताव्यस्त पडलाय. तर काही नदीत  उडाल्याने नदी त सुध्दा प्रदूषण होत आहे. त्यामुळे तेथे कार्यरत सुरक्षारक्षक, नातेवाईक, कोरोना बाधितांचे नातेवाईक आणि कर्मचारी यांनाही बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही . रुग्णालया तून हा घातक कचरा विभक्तीकरण करून त्याची विल्हेवाट करण्याची जबाब दारी व्यवस्थापनाची असते. परंतु, डॉ. पॉल केवळ रुग्णांकडून भरमसाठ बिलं गोळा करण्यात व्यस्त असून स्वच्छता व सुरक्षेच्या नावाने बेफिकीर असल्याचा आरोप छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निखिल गोळे यांनी केला आहे. डॉ. संजित  पाँल यांच्यावर बायो मेडिकल वेस्ट नियम १९९८, सुधारित २०१६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी गोळे यांनी केली आहे

संबंधित पोस्ट