शिवाजी रगडेंच्या दणक्याने झाली डांबून ठेवलेल्या रुग्णाची मॅक्स लाईफ रुग्णालयातुन सुटका

उल्हासनगर (प्रतिनिधी):  कोरोनाने बाधित झालेल्या एका ५५  वर्षीय हातमजुर रुग्णाला उल्हासनगरच्या मॅक्स लाईफ या खाजगी रुग्णालयामध्ये  दाखल करण्यात आले होते , ८ दिवसांत रुग्णालयाचे १ लाख ८० रुपयांचे बिल जोवर भरत नाही तोवर डिस्चार्ज  देणार नाही यासाठी रुग्ण बरा झाल्यानंतरही  तीन दिवस डांबून ठेवले होते.त्यामुळे मदतीसाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांच्या कडे धाव घेतली.

यानंतर शिवाजी रगडे यांनी सदर प्रकाराची प्रशासन व पोलिसात तक्रार करून रुग्णालयास जाब विचारण्यासाठी धडक दिली. रगडे यांनी रुग्णालयाकडे उपचाराचा तपशील मागितला .तेव्हा एकच ईंजेक्शन मेरोफिक कंपनीचे प्रत्येक दिवशी तीन ईंजेक्शन सुमारे ७१२, २४००, ३९०० रुपयांचे दर लावुन, अतिदक्षता विभागाचे चुकीचे दर,आणि ईतर अवास्तव दर लावून रुग्णाला बिल भरण्याचा तगादा लावला होता. 

शिवाजी रगडे यांनी बिल आकारणीत झालेली अनियमितता व वाढिव भरमसाठ बिलांच्या विरोधात रुग्णालयाची झाडा झडती घेताच रुग्णालय प्रशासनाची भांबेरी उडाली व त्याना व्यवस्थित उत्तर सुध्दा देता आले नाही . तेव्हा या  रुग्णालयाने रुग्णाचे १ लाख ८० रुपये बिलापैकी वाढिव ८० हजार रुपये  वजा करुन रुग्णाची सुटका केली. तेव्हा सुटका झाल्याने आनंदी झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी शिवाजी रगडे यांचे आभार मानले.

संबंधित पोस्ट