पोलिस दलात कार्यरत असलेल्या दोन जुळ्या भावांचा कोरोनाने मृत्यु .
- by Rameshwar Gawai
- Jul 31, 2020
- 666 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : एकाच दिवशी जन्म झाला असुन पोलिस दलात ही एकत्रच भरती झाले आणि पोलिसांचे एकत्रच ट्रेनिंग देवुन पोलिस दलात सोबतच काम करणाऱ्या दोन जुळ्या पोलीस भावांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने उल्हासनगर शहरात हळहळ व्यक्त होत असुन पोलिस दलात शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे .
उल्हासनगर कॅंप ४ येथे राहणारे दिलीप घोडके आणि जयसिंग घोडके हे दोघेही एकाच दिवशी पोलीस दलात भरती झाले होते. दिलीप घोडके हे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात, तर जयसिंग घोडके हे अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होते.
घोडके बंधू २०२३ मध्ये सोबतच निवृत्त होणार होते . परंतु नियतीला कदाचित ते मान्य नव्हते . आठ दिवसांपूर्वी म्हणजेच २० जुलै रोजी दिलीप घोडके यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर त्यानंतर २८ जुलै रोजी जयसिंग घोडके यांचा ही कोरोनाने मृत्यु झाला असे आठ दिवसाच्या फरकाने दोन्ही घोडके बंधुंचा कोरोना मुळे मृत्यु झाल्याने पोलिस दलावर दुखाचा डोंगऱ कोसळला असुन उल्हासनगर मधे हळहळ व्यक्त होत आहे .

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम