हा तर अन्यायाचा कळस

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने गेल्या चार महिन्यांपासून उपाययोजना केल्या आहेत त्याचा किती परिणाम झाला हा संशोधनाचा विषय आहे पण लॉकडाऊन आणि त्यात बंद असलेल्या सार्वजनिक परिवहन सेवांमुळे कामा धंद्याला जाणाऱ्या किंवा रुग्णालयात उपचारांसाठी जाणाऱ्यांची मात्र गैरसोय झाली आहे दरम्यान सरकारने लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात सवलत देऊन अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे या अत्यावश्यक सेवांमध्ये सरकारी तसेच पालिका कर्मचारी आणि वैद्यकीय सेवांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे मात्र ही वैद्यकीय सेवा ज्या आजारी रुग्णांसाठी आहे त्यांना मात्र लोकल प्रवासाची सुविधा नाही हा एक प्रकारे अन्यायाचा कळसच म्हणावा लागेल कारण मुंबईच्या उपनगरांमध्ये तसेच मुंबई लगतच्या वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, वाशी  बेलापूर , पनवेल येथील मुंबईतील सर्व रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तसेच कोरोनाच्या संकट काळात वेगवेगळ्या ठिकाणी वृत संकलनासाठी जाणाऱ्या पत्रकारांना मात्र लोकल प्रवासाची सुविधा नाही. सरकारला एक गोष्ट कळायला हवी की महाराष्ट्रात फक्त कोरोनचेच रुग्ण आहेत का इतर आजाराचे जे रुग्ण आहेत त्याचे काय? किडनी, हार्ट, ब्रेन यासारख्या गंभीर आजाराच्या रुग्णांना लोकल प्रवास नाकारला जात असल्यामुळे तडफडून घरातच मरण्याची वेळ आली आहे त्यामुळे रेल्वेच्या नाकर्तेपणामुळे ज्यांना मुंबईत उपचारासाठी जाता येत नाही आणि ज्यांच्यावर उपचार अभावी मारण्याची पाळी आलीय अशा रुग्णांच्या मृत्यूला रेल्वे मंत्र्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आजारी रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये असे सर्वानाच वाटते आणि त्यासाठी सरकारने जे नियम केले आहेत त्याचे लोक पालनही करीत आहे असे असताना गंभीर आजारी रुग्णांना लोकल प्रवास का नाकारला जात आहे. गंभीर आजारी रुग्णांनी रेल्वेतून प्रवास केल्याने कोरोना आणखी पसरणार आहे का? आजारी माणसाला उपचार करून घेण्याचा मौलिक अधिकार घटनेतच आहे आणि त्यासाठी त्याला प्रवासाची साधने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे पण सरकार मात्र आजारी माणसांच्या मौलिक अधिकाराची गळचेपी करीत आहे त्यामुळे सरकारची ही कृती मानवी अधिकारांचे हणन करणारी आहे. त्यामुळे आता याबाबत जनतेनेच आवाज उठवायला हवा तसे पाहता मुंबईची उपनगरे आणि मुंबई लगतच्या ठाणे पालघर जिल्ह्यातील शहरांमध्ये दवाखाने तसेच खाजगी रुग्णालये आहेत पण त्यांची फी अवाच्या सव्वा असल्याने गोरगरीब माणसाला तेथे उपचार करून घेणे परवडत नाही त्यातच लॉकडाऊन मुळे उद्योगधंदे बंद पडल्याने लोकांकडे पैसा नाही त्यांच्या खाण्यापिण्याचे हाल सुरू आहेत अशा स्थितीत खाजगी रुग्णालयात महागडे उपचार कसे करणार? आणि नेमकी हीच गोष्ट जर सरकारला कळत नसेल तर मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असो त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. रेल्वे मंत्रालय आजारी रुग्णांना प्रवास नाकारीत असल्याने आता या प्रकरणाची मानव हक्क आयोगाने गंभीर दखल घेऊन रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी लोक करीत आहेत. अगोदरच सतत वाढवला जात असलेल्या लॉक डाऊन बद्दल लोकांच्या मनात असंतोष आहे त्यात आता आजारी माणसांना लोकल प्रवास नाकारला जात असल्याने लोकांच्या संतापाचा कडेलोट होत असून लोक या अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा तयारीत आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट