उल्हासनगर मध्ये चेस द व्हायरस मोहिमे अंतर्गत ६ ठिकाणी ॲंटिजेन टेस्ट सेंटर सुरु . युवराज भदाणे .
- by Rameshwar Gawai
- Jul 30, 2020
- 449 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असुन तो नियंत्रणात आणन्यासाठी महापालिका आयुक्त डॉ . राजा दयानिधी सर्व तो प्रयत्न करत असुन त्यांच्या प्रयत्नाना जवळपास यश आल्याचे ही दिसत आहे . तर या कोरोना ला पुर्णपणे हरविन्यासाठी . चेस द व्हायरस , ही मोहीम जोरात सुरु केली असुन शहरात सहा ठिकाणी ॲंटिजेन टेस्ट सेंटर सुरु केल्याची माहीती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी डॉ युवराज भदाणे यानी दिली आहे .
त्यानी पुढे सांगितले आहे की उल्हासनगर शहरात पाच हजार रॅपिड ॲंटिजेन टेस्ट होणार असुन ही टेस्ट कोविड रुग्णा करिता मोफत असणार आहे . तर सहा जागी ॲंटिजेन टेस्ट सेंटर सुरु केले आहे . रेड क्रॉस सोसायटी उल्हासनगर ३ . मिड टाऊन गोल मैदान उल्हासनगर १. एस ई एस स्कुल उल्हासनगर २ . प्राईम डायग्नोस्टिक सेंटर उल्हासनगर ३ .परफेक्ट लॅबोरटी उल्हासनगर ४ . यु एम सी स्कुल २८ . उल्हासनगर ५ . या ठिकाणी ॲंटिजेन टेस्ट होणार असुन या टेस्ट चा रिपोर्ट अर्धा तासात येणार असल्याची माहीती डॉ . भदाणे यानी दिली आहे .

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम